मराठी बातम्या /बातम्या /देश /PM Modi LIVE: लसीकरणाचं काम केंद्राकडेच का असेल राज्यांकडे का नसेल? मोदींनी दिलं स्पष्टीकरण

PM Modi LIVE: लसीकरणाचं काम केंद्राकडेच का असेल राज्यांकडे का नसेल? मोदींनी दिलं स्पष्टीकरण

PM Narendra Modi LIVE Address: 21 जूनपासून लसीकरणाचं काम केंद्र सरकार पुन्हा आपल्या हाती घेणार असल्याची मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

PM Narendra Modi LIVE Address: 21 जूनपासून लसीकरणाचं काम केंद्र सरकार पुन्हा आपल्या हाती घेणार असल्याची मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

PM Narendra Modi LIVE Address: 21 जूनपासून लसीकरणाचं काम केंद्र सरकार पुन्हा आपल्या हाती घेणार असल्याची मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

    नवी दिल्ली, 7 जून: लसीकरणाचं काम केंद्राने स्वतःकडेच ठेवायचा मोठा निर्णय घेतला असल्याचं पंतप्रधान मोदींनी जाहीर केलं. जनतेशी संवाद साधताना (PM Modi LIVE interaction ) त्यांनी ही माहिती दिली. 21 जूनपासून सर्व 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना मोफत लस (Free corona vaccine for all) देण्याची जबाबदारी केंद्राची असेल, हे त्यांनी स्पष्ट केलं.

    "Covid-19 ही गेल्या शंभर वर्षातली सर्वांत भयानक महासाथ, महामारी आहे. या अदृश्य आणि रूप बदलणाऱ्या शत्रूशी लढायचं असेल तर सर्वात मोठं अस्त्र कोविड प्रोटोकॉल हेच आहे. मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग आणि इतर स्वच्छतेचे नियम पाळले तरच ही साथ आटोक्यात राहील. लसीकरण हे आपलं सुरक्षा कवच आहे", असं मोदी म्हणाले.

    16 जानेवारीपासून एप्रिलपर्यंत केंद्र सरकारच लसीकरण (corona Vaccination) करत होते. त्यानंतर प्रयोग म्हणून 1 मे पासून 25 टक्के लसीकरणाचं काम राज्यांना दिलं गेलं. राज्यांनी आपापल्या पद्धतीने त्यासाठी प्रयत्नही केले. पण अनेक राज्यांनी हे काम केंद्राकडेच असावं असं नमूद केलं आहे.

    पहिली व्यवस्थाच चांगली होती, असं काही राज्यांनी सांगितलं. 1 मे पूर्वी जी व्यवस्था होती, तशीच ती करावी अशी मागणी वाढली. आता राज्यांकडे असलेली 25 टक्के लसीकरणाची जबाबदारीही केंद्र सरकार आपल्या हाती घेणार आहे, असं मोदींनी जाहीर केलं.

    पंतप्रधान गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून नोव्हेंबरपर्यंत मोफत धान्य मिळणार- PM

    केंद्राच्या लसीकरणावर टीका माध्यमांतून झाली, त्याचा उल्लेख मोदींनी केला. "ज्येष्ठ नागरिकांचं लसीकरण आधी का केलं, राज्यांना का अधिकार दिले गेले नाहीत याबाबत केंद्र सरकारला विचारलं गेलं. काहींंनी त्याबद्दल टीकाही केली. राज्य सरकारला आपापल्या पातळीवर प्रयत्न करत असतील तर केंद्राला काहीच अडचण नाही. म्हणून 1 मेपासून आम्ही ते काम राज्यांना दिलं.  साऱ्या जगात लशींची परिस्थिती काय आहे हे राज्यांच्याही लक्षात आलं. मेमध्ये दुसरी लाट घातक होत असतानाच लसीकरणात गडबड उडाली. अनेक राज्यांना त्याचा अनुभव आला. आता मात्र मोफत लसीकरणाचं काम केंद्र आपल्या हाती घेत आहे."

    21 जूनपासून देशातल्या 18 वर्षांपुढच्या सर्वांसाठी केंद्र सरकार मोफत लस देणार. राज्यांकडे त्यांचा कोटा दिला जाईल, अशी मोठी घोषणा मोदींनी केली.

    पंतप्रधान मोदींच्या घोषणेनंतर तुमच्या कोरोना लसीकरणावर काय होणार परिणाम?

    "मागच्या 50-60 वर्षांचा इतिहास पाहिला तर लक्षात येईल विदेशातून भारतात लशी यायच्या. परदेशात सगळं लसीकरण पूर्ण झालं तरी आपल्या देशात लस द्यायला सुरुवातही व्हायची नाही. 2014 मध्ये देशानं आम्हाला संधी दिली त्या वेळी भारतात लसीकरणाचं कव्हरेज 60 टक्क्यांच्या आसपास होता. आता ते 90टक्क्यांवर आलं आहे", असं मोदी म्हणाले.

    "लहान मुलांना अनेक जीवघेण्या आजारांपासून वाचवण्यासाठी लसीकरणात काही नवी लशी आणल्या गेल्या. गरिबांच्या चिंतेपोटी हे केलं. लसीकरणाचं लक्ष्य 100 टक्के होत असतानाच कोरोनाने आपल्याला घेरलं. आता भारत एवढ्या मोठ्या लोकसंख्येला वाचवू शकेल का याचीच चर्चा जगात होती. पण नीती साफ असेल, नियंत्रण असे तर त्याचे परिणाम दिसतात", असंही त्यांनी सांगितलं.

    "देशात वर्षभरात दोन Made in India लसी आल्या. अनेक मोठ्या देशांपेक्षा आपला देश मागे नाही, हे भारताने दाखवलं. मी आज बोलत आहे, तोपर्यंत देशभरात 23 कोटी डोस दिले गेले आहेत. विश्वासेन सिद्धी, असं म्हणतात. आपल्या प्रयत्नांना तेव्हाच यश मिळतं जेव्हा स्वतःवर विश्वास असतो. आपल्या वैज्ञानिकांवर विश्वास ठेवूनच त्यांचं संशोधनाचं काम सुरू होतं तेव्हाच लॉजिस्टिकचं काम सुरू झालं."

    "गेल्या वर्षी जेव्हा कोरोनाची संख्या हजारांमध्ये होती, तेव्हाच व्हॅक्सिन टास्क फोर्स तयार करण्यात आला.

    देशात सध्या 7 कंपन्या वेगवेगळ्या लसी तयार करत आहे. दुसऱ्या देशातल्या कंपन्यांनाही लस खरेदीसाठी संपर्क करण्यात आला आहे. लहान मुलांच्या लसीकरणासाठी दोन कंपन्यांच्या ट्रायल्स सुरू आहेत", अशी माहिती पंतप्रधानांनी दिली.

    PM Modi LIVE : कोरोनाची दुसरी लाट अजून गेली नाही - पंतप्रधान मोदी

    पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी संध्याकाळी 5 वाजता राष्ट्राला उद्देशून भाषण करणार हे जाहीर होताच पंतप्रधान नेमकी कुठली नवी घोषणा करणार याविषयी चर्चा सुरू झाली.

    सोमवारी (7 जून) सकाळी नोंदल्या गेलेल्या कोविड रुग्णांचा आकडा गेल्या 45 दिवसांतला सर्वात नीचांकी आकडा आहे. देशभरात 1 लाख 636 नवे कोरोना रुग्ण सापडले. अॅक्टिव्ह केसेसची संख्या  14,01,609 पर्यंत कमी झाली आहे. कोरोना मृत्यूंची संख्या मात्र 2,427 ची भर पडल्याने 3,49,186 वर पोहोचली आहे.

    मोदी कोरोना काळातले लॉकडाउनसारखे निर्बंध शिथिल करण्याविषयी बोलणाक की, लॉकडाउनमुळे ठप्प झालेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी काही पॅकेज किंवा योजना जाहीर करणार हे थोड्याच वेळात उलगडेल.

    मागच्या भाषणात काय म्हणाले होते मोदी?

    पंतप्रधान मोदींनी यापूर्वी 21 मे रोजी जनतेला संबोधित केलं होतं. त्या वेळी कोरोनाचा कहर अनेक राज्यात उच्चांकावर पोहोचलेला होता आणि जवळपास सारा देश लॉकडाउनमध्येच होता.  कोरोनाच्या  कित्येक देशवासीयांनी आप्त गमावले आहेत चाा उल्लेख करताना त्या वेळी मोदी भावुक झाले होते. वैद्यकीय क्षेत्रातले कोरोना योद्धे, डॉक्टर, नर्स, आरोग्य सेवक यांचा उल्लेख करत कोरोनाविरोधातल्या लढाईतलं त्यांचं योगदान मोठं असल्याचं पंतप्रधान म्हणाले होते. जहाँ बिमार वहीं  उपचार असं ब्रीद सांगत Covid-19 च्या रुग्णांना त्यांच्या आसपासच उपचारांची सोय उपलब्ध झाली पाहिजे, यासाठी प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.

    कोरोनाची दुसरी लाट आली आणि ती घातक आहे याची जाणीव होत असताना 20 एप्रिललासुद्धा मोदींनी देशाला संबोधित केलं होतं. त्या वेळी सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क, सॅनिटायझर वगैरै कोरोना नियम पाळले तर लॉकडाउनची वेळ येणार नाही, असं त्यांनी आश्वस्त केलं होतं. पण पुढच्या पंधरा दिवसांच्या आत संपूर्ण देशात टाळेबंदी अटळ असल्याची परिस्थिती उद्भवली.

    आता महाराष्ट्रासह संपूर्ण देशातली लाट हळूहळू ओसरत असल्याचं चित्र आहे. त्याच वेळी वैज्ञानिकांनी तिसऱ्या लाटेची शक्यता असल्याचंही सांगितलं आहे. आता मोदी आजच्या भाषणात काय भूमिका घेतात, Unlock आणि निर्बंधांबद्दल काय सांगतात याकडे लक्ष आहे.

    First published:

    Tags: Coronavirus, Narendra modi, Sanjeevani