PM नरेंद्र मोदींच्या हस्ते झाला गरीब कल्याण योजनेचा शुभारंभ, 25000 प्रवासी मजूरांना मिळणार काम

PM नरेंद्र मोदींच्या हस्ते झाला गरीब कल्याण योजनेचा शुभारंभ, 25000 प्रवासी मजूरांना मिळणार काम

या योजनेअंतर्गत 25 क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्या जाणार आहेत. ज्यामध्ये ग्राम पंचायत भवन, विहिरींचे बांधकाम, अंगणवाडी, राष्ट्रीय महामार्गांची कामे, हॉर्टिकल्चर यांसारख्या एकूण 25 सेक्टर्सचा समावेश आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 20 जून : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गरीब कल्याण योजनेचा शुभारंभ झाला. 50 हजार 000 कोटींची असणारी ही योजना लॉकडाऊनमध्ये घरी पोहोचलेल्या मजूरांसाठी महत्त्वाची आहे. या योजनेअंतर्गत 25 हजार प्रवासी मजूरांना काम मिळणार आहे. मुख्यमंत्री नितिश कुमार आणि उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांच्या उपस्थितीत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. खगड़िया जिल्ह्यातील तेलिहार गावातून ही योजना लाँच करण्यात आली.

लॉकडाऊननंतर गावी पोहोचलेल्या मजूरांसाठी ही योजना आजपासून सुरू झाली. याबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 18 जूनला माहिती दिली होती. प्रवासी मजुरांसाठी रोजगार उपलब्ध करून देणे हे या योजनेचे उद्दिष्ट असल्याचे यावेळी अर्थमंत्री म्हणाल्या होत्या. तसेत, 'बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, ओडिशा आणि राजस्थान या राज्यांमध्ये सर्वाधिक मजूर परतले आहेत. याठिकाणी 116 जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक मजूर आले आहेत. त्यांच्याकरता रोजगार या योजनेतून उपलब्ध करता येईल.', असेही अर्थमंत्री म्हणाल्या होत्या.

अशी आहे योजना

या योजनेअंतर्गत 25 क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्या जाणार आहेत. ज्यामध्ये ग्राम पंचायत भवन, विहिरींचे बांधकाम, अंगणवाडी, राष्ट्रीय महामार्गांची कामे, हॉर्टिकल्चर यांसारख्या एकूण 25 सेक्टर्सचा समावेश आहे. 125 दिवसांमध्ये ही योजना राबवण्यात येणार आहे. 116 जिल्ह्यांमध्ये ही योजना सुरू करण्याचा सरकारचा मानस आहे. जल जीवन मिशन, ग्राम सडक योजना यांसारख्या योजनांमध्ये प्रवासी मजूरांना देखील संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.

या राज्यातील मजूरांना फायदा

या अभियानाअंतर्गत बिहारच्या 32, उत्तर प्रदेशच्या 31, मध्य प्रदेशचे 24, राजस्थानच्या 22 , ओडिशामधील 4, झारखंडच्या 3 जिल्ह्यांमध्ये ही योजना सुरू करण्यात येणार आहे. बिहारमधून या योजनेचा शुभारंभ होणार आहे.

संपादन-प्रियांका गावडे.

First published: June 20, 2020, 11:20 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading