Home /News /national /

पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडला 'अटल टनल' लोकार्पण सोहळा, पण भाजप सरकारकडून झाली मोठी चूक

पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडला 'अटल टनल' लोकार्पण सोहळा, पण भाजप सरकारकडून झाली मोठी चूक

या उद्धघाटन सोहळ्याला नरेंद्र मोदी यांच्यासोबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर उपस्थित होते

नवी दिल्ली, 06 ऑक्टोबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या (PM Narendra Modi) हस्ते  मनाली आणि लेहला जोडणाऱ्या अटल रोहतांग बोगद्याचं (Atal Rohtang Tunnel) चं तीन दिवसांपूर्वी लोकार्पण सोहळा पार पडला. पण, या सोहळ्यात पंतप्रधान मोदींसोबत असणारे हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री आणि इतर मंत्री हे कोरोनाबाधित आमदाराच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे. 3 ऑक्टोबर रोजी  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी  9.02 किलोमीटर लांब असलेल्या अटल बोगद्याचं उद्घाटन केलं होतं. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या जाहीर कार्यक्रमात हिमाचल सरकारकडून मोठी चूक झाली आहे. केंद्र सरकारचा मोठा निर्णय; स्ट्रीट फूडचीही होणार होम डिलिव्हरी, विक्रेत्यांना म या उद्धघाटन सोहळ्याला नरेंद्र मोदी यांच्यासोबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर उपस्थित होते. परंतु, या कार्यक्रमाला हजर राहण्याआधी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर आणि इतर मंत्री यांनी कोरोनाबाधित आमदाराची भेट घेतल्याचे समोर आले आहे. नागपूरच्या सर्वात मोठ्या वेश्यावस्तीवर पोलिसांची कारवाई,16महिलांसह12 जण ताब्यात मुख्यमंत्री जयराम ठाकूर आणि वनमंत्री राकेश पठाणिया हे कुल्लूमधील बंजारचे आमदार सुरेंद्र शौरी यांच्या  संपर्कात आले होते. आमदार शौरी यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आमदार शौरी यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना चाचणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. असा आहे अटल बोगदा! हिमाचल प्रदेशातल्या लाहौल-स्पीती जिल्ह्यात मनाली-लेह महामार्गावर सर्वाधिक उंचीवर देशातला सर्वात मोठा बोगदा तयार करण्यात आला आहे. BROच्या इंजिनिअर्सनी हा बोगदा तयार केला असून ते अतिशय आव्हानात्मक काम होतं. समुद्र सपाटीपासून याची उंची 10,000 फुटांवर आहे. 9 किलोमीटरचा हा बोगदा आहे. त्याला माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव देण्यात आलं आहे.  याआधी माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्या सरकारने मनाली-लेहमध्ये वर्षभर संपर्क राहावा म्हणून रस्त्याची योजना तयार केली होती. माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयींनी 2002 मध्ये रोहतांगमध्ये बोगदा तयार करणार असल्याचं जाहीर केलं आणि 2019 मध्ये वाजपेयींच्या नावावरच या बोगद्याचं नाव 'अटल बोगदा' असं ठेवण्यात आलं. हाथरस प्रकरणातील आरोपींच्या समर्थनात भाजपकडूनच मेळावे, हे किळसावाणे : शिवसेना आतापर्यंत थंडीचे 6 महिने होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे लाहौलच्या परिसराचा देशाशी संपर्क तुटलेला असायचा. पण आता या बोगद्यामुळे हा भाग देशाशी 12 महिने संपर्कात राहणार आहे. एवढ्या उंचीवरच्या जगातील कोणत्याही महामार्गावर इतक्या लांबीचा बोगदा अस्तित्वात नाही. त्यामुळे अशा प्रकारचा हा जगातील एकमेव बोगदा ठरला आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या