मराठी बातम्या /बातम्या /देश /

पंतप्रधान मोदी शेतकरी महिलेच्या पाया पडण्यासाठी झुकले, VIDEO VIRAL

पंतप्रधान मोदी शेतकरी महिलेच्या पाया पडण्यासाठी झुकले, VIDEO VIRAL

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कर्नाटकमधील एका सभेतील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये मोदी एका महिलेला पुरस्कार देत असताना तिच्या पाया पडल्याचं दिसत आहे.

  • Published by:  Suraj Yadav

बेंगळुरू, 03 डिसेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कर्नाटकमधील एका सभेतील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये मोदी एका महिलेला पुरस्कार देत असताना तिच्या पाया पडल्याचं दिसत आहे. कर्नाटकात तुमकूर इथं गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांना कृषी कर्मण पुरस्कार वितरीत करण्यात आले. यावेळी एका महिलेने पुरस्कार स्वीकारल्यानंतर मोदींच्या पाया पडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मोदींनी तिला थांबवलं आणि स्वत:च तिच्या पाया पडले.

पंतप्रधान मोदींचा कर्नाटकातील हा व्हिडिओ केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी ट्विट केला आहे. मोदी दोन दिवस कर्नाटक दौऱ्यावर आहेत. गुरुवारी त्यांनी अनेक कार्यक्रमात भाग घेतला. यात तुमकूर इथल्या कृषी कर्मण आणि किसान क्रेडिट कार्ड वितरण समारंभाचाही समावेश होता. या कार्यक्रमात कृषी क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

कृषी कर्मण पुरस्कारांचे वितरण सुरू असताना पुरस्कार प्राप्त महिला स्टेजवर आली. तेव्हा मोदींच्या हस्ते प्रशस्तीपत्र तिला देण्यात आलं. प्रशस्तीपत्र स्वीकारल्यानंतर महिलेनं मोदींच्या पाया पडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पंतप्रधान मोदींनी तिला थांबवलं आणि स्वत:च तिच्या पाया पडण्यासाठी झुकले.

पंतप्रधान मोदींचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी ट्विटरवर म्हटलं की, प्रत्येक आई आणि मुलीचा आदर! बेंगळुरूत जेव्हा एका महिलेनं मोदींच्या पाया पडण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी फक्त महिलेला आदराने रोखलंच नाही तर स्वत: त्या महिलेच्या पाया पडले. हा व्हिडिओ मोदी जे करतात ते आचरणात आणतात हे सांगण्यासाठी पुरेसं आहे असंही हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे.

वाचा : भाजपची नवी मोहीम; Missed call देण्यासाठी का शेअर केलाय हा नंबर?

First published:

Tags: Karnataka, Narendra modi