BRICS : दहशतवादामुळे जगाच्या अर्थव्यवस्थेचं मोठं नुकसान - पंतप्रधान नरेंद्र मोदी

BRICS : दहशतवादामुळे जगाच्या अर्थव्यवस्थेचं मोठं नुकसान - पंतप्रधान नरेंद्र मोदी

दहशतवादाची झळ जगाला बसली असून त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचं सुमारे एक ट्रिलियन डॉलरचे नुकसान झालं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले.

  • Share this:

ब्रासिलिया, 15 नोव्हेंबर : दहशतवादाची झळ जगाला बसली असून त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचं सुमारे एक ट्रिलियन डॉलरचे नुकसान झालं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले. ते 11 ब्रिक्स परिषदेत बोलत होते. अर्थव्यवस्थेच्या अशा स्थितीमुळे व्यापाराचं मोठं नुकसान झालं असल्याचं मतही पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं.

मोदी म्हणाली की, दहशतवादामुळे विकास, शांतता आणि भरभराट धोक्यात आली आहे. यामुळे विकसनशील देशांची आर्थिक वृद्धी 1.5 टक्क्यांनी कमी झाली असल्याचंही मोदींनी सांगितले. ब्राझील, चीन, रशिया आणि दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष या परिषदेत उपस्थित होते.

दहशतवाद आणि त्याला पुरवण्यात येणारं खतपाणी, अमली पदार्थांची तस्करी, संघटित गुन्हेगारी यामुळं संशयाचं वातावरण तयार झालं आहे. याचाही परिणाम अप्रत्यक्षपणे व्यापारावर झाला. गेल्या दहा वर्षांत दहशतवादाने 2.25 लाख जणांचे बळी घेतले असल्याचंही मोदी म्हणाले.

ब्रिक्स परिषदेत दहशतवादाशी लढा देण्यासाठी रणनितीवर पहिलं चर्चासत्र आयोजित केलं गेलं. याचा आनंद असून अशा गोष्टींनी दहशतवाद आणि इतर संघटित गुन्ह्यांविरुद्ध ठोस भूमिका घेता येईल आणि ब्रिक्स सुरक्षा सहकार्य वाढेल असंही मोदींनी सांगितलं.

ब्रिक्स जलमंत्र्यांची पहिली बैठक भारतात आयोजित करण्यात यावी असा प्रस्तावही मोदींनी मांडला. शहरी भागात जलव्यवस्थापन, सांडपाण्याचं नियोजन योग्य पद्धतीने व्हाव यासाठी प्रयत्न करत असल्याचंही मोदींनी सांगितलं. तसेच भारतात फिट इंडिया मूव्हमेंट सुरू केली आहे. त्यामुळे तंदुरुस्ती आणि आरोग्य क्षेत्रात संपर्क वाढावा असंही वाटत असल्याचं मोदी म्हणाले.

VIDEO : सेनेच्या तीन अंकी नाटकावर लक्ष्य, आशिष शेलारांचा टोला

First published: November 15, 2019, 7:38 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading