पंतप्रधान नरेंद्र मोंदींना 'आयजी नोबेल' पुरस्कार; काय आहे हे IG Nobel Prize आणि कशाबद्दल मिळालं मोदींना?

पंतप्रधान नरेंद्र मोंदींना 'आयजी नोबेल' पुरस्कार; काय आहे हे IG Nobel Prize आणि कशाबद्दल मिळालं मोदींना?

Ig Nobel prize मिळवणारे नरेंद्र मोदी हे भारताचे दुसरे पंतप्रधान आहेत. कुणाला आणि कशाबद्दल दिला जातो हा पुरस्कार?

  • Share this:

नवी दिल्ली, 21 सप्टेंबर : विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणार्‍यांचा नोबेल पुरस्काराने (Nobel prize) जागतिक पातळीवर सन्मान केला जातो. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचं शांततेच्या नोबेलसाठी नामांकन झाल्याने ते चर्चेत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदीही एका पुरस्काराने चर्चेत आले आहेत. तो पुरस्कार म्हणजे आयजी नोबेल. (ig nobel) काय आहे हा पुरस्कार, कुणाला आणि कशाबद्दल दिला जातो हा पुरस्कार? जाणून घेऊ या.

आयजी नोबेल हा एक उपहासात्मक किंवा व्यंगात्मक पुरस्कार (parody award) आहे. दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात तो दिला जातो. हा पुरस्कार कमी महत्त्वाच्या वैज्ञानिक संशोधनासाठी दिला जातो. विनोदी पाक्षिक अनल्स ऑफ इंपोर्टेबल रिसर्चच्या (Annals of Improbable Research) वतीने हा पुरस्कार जाहीर केला जातो. जगावेगळ्या गोष्टी करणाऱ्या  अर्कांना किंवा व्यंगात्मक परिस्थितीला कारणीभूत झालेल्या व्यक्तींना हा पुरस्कार जाहीर केला जातो. पण तो फारसा कुणी मनावर घेत नाही. आणखी महत्त्वाचं म्हणजे नोबेल पुरस्कारासारखा या पुरस्कार वितरणाचा सोहळाही होत नाही. तो फक्त व्यंगात्मक दृष्टिकोनातून जाहीर केला जातो आणि हलक्या फुलक्या विनोदाच्या अंगाने किंवा उपहासगर्भ भावनेतून तो पाहिला जातो.

वाजपेयींनंतर मोदींना मिळाला Ig Nobel

या आधी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना हा पुरस्कार घोषित झाला होता. 1998 नंतर चाचणीसाठीच्या अणुस्फोटांनंतर त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला होता. एकीकडे अणुचाचणी घडवून जगात शांती नांदण्यासाठी भारत अण्विकदृष्ट्या स्वावलंबी झाल्याचं त्यांनी भाषणात म्हटलं होतं. त्यामुळे 'आक्रमकपणे शांतीचा पुरस्कार' केल्याबदद्ल त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला होता. त्यानंतर हा व्यंगात्मक पुरस्कार मिळविणारे मोदी हे दुसरे पंतप्रधान ठरले आहे.

मोदींना पुरस्कार देण्याचं कारण

बेरोजगारी, स्थलांतरित मजुरांच्या मृत्यूची आकडेवारी या बाबींवरून विरोधकांनी आणि टीकाकारांनी सरकारला लक्ष्य केलं असतानानाही त्याकडे दुर्लक्ष करून कोरोनाचा (coronavirus in india) प्रसार रोखण्यासाठीच्या उपयांबद्दल पंतप्रधान जनजागृती करण्यात यशस्वी झाले, असा शेरा मारत त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.  कोरोनाच्या महासाथीबद्दल वैद्यकीय जनजागृती या सदराखाली मोदींची निवड केल्याचं पाक्षिकाने म्हटलं आहे. 'जीवन-मृत्यूवर थेट परिणाम करेल असे शास्त्रज्ञ किंवा डॉक्टरांपेक्षाही चांगले प्रयत्न COVID-19 च्या काळात केल्याबद्दल हा पुरस्कार मोदींना देण्यात येत आहे', असं या मॅगझिनने म्हटलं आहे.

वैद्यकीय जनजागृतीसाठी हा पुरस्कार मिळविणारे मोदी हे एकमेव नसून, ब्राझीलचे अध्यक्ष जेयर बोलसोनारो, ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन, तुर्कस्तानाचे राष्ट्रपती रजब तैयब एर्दुगान, रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन, तुर्कमेनिस्तानचे राष्ट्रपती गुरबांगुली बेरदीमुहामेदोव, बेलारूसचे राष्ट्रपती अलेक्झांडर लामाशेंको, मॅक्सिकोचे राष्ट्रपती एंद्रेस मैनुएल लोपेज ओब्रादोर आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावांचाही पुरस्कारार्थींमध्ये समावेश आहे.

Published by: अरुंधती रानडे जोशी
First published: September 21, 2020, 8:09 PM IST

ताज्या बातम्या