पंतप्रधान मोदींचं चार वर्षातलं सगळ्यात छोटं भाषण

पंतप्रधान मोदींचं चार वर्षातलं सगळ्यात छोटं भाषण

गेल्या चार वर्षांत स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलेलं भाषण हे सगळ्यात छोटं भाषण ठरलंय.

  • Share this:

15 ऑगस्ट: आज भारताचा 71 वा स्वातंत्र्यदिन. हा दिवस आज देशभरात अत्यंत उत्साहात साजरा केला जातोय. गेल्या चार वर्षांत स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलेलं भाषण हे सगळ्यात छोटं भाषण ठरलंय.

यावर्षी पंतप्रधान मोदींनी 54 मिनिटांचं भाषण दिलं. 2014 साली मोदींनी 65 मिनिटांचे भाषण दिलं होतं तर 2015 साली 86 मिनिटांचं भाषण दिलं आणि सगळ्यात लांबलचक 94 मिनिटांचं भाषण मोदींनी दिलं होतं. यावर्षी मात्र मोदींनी आपल्या भाषणाचं लांबी कमी केली. तशी ग्वाहीच पंतप्रधानांनी दिली होती. त्याप्रमाणे आज त्यांनी भाषण कमी केलं.

आपल्या भाषणात काश्मीरचा प्रश्न काश्मिरींना आलिंगन देऊनच सुटेल असं मोदी म्हणाले. त्यासोबतच नोटाबंदी, जीएसटी या निर्णयाचंही त्यांनी तोंडभरून कौतुक केलं. आपल्या या भाषणात न्यू इंडियाचा नारा त्यांनी दिला. एकूणच आपल्या एका तासाहूनही कमी लांबीच्या भाषणात  2022 पर्यंत एक भव्य दिव्य न्यू इंडियाच्या निर्मितीचं स्वप्न त्यांनी रेखाटलं.

First published: August 15, 2017, 3:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading