पंजाबमध्ये जाळला पीएम मोदींचा प्रतिकात्मक पुतळा, जेपी नड्डा म्हणाले.. हा तर राहुल दिग्दर्शित ड्रामा!

पंजाबमध्ये जाळला पीएम मोदींचा प्रतिकात्मक पुतळा, जेपी नड्डा म्हणाले.. हा तर राहुल दिग्दर्शित ड्रामा!

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांनी राहुल गांधी यांच्यावर घणाघाती आरोप केला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर: विजयादशमी अर्थात दसऱ्यानिमित्त पंजाबमध्ये (Punjab) रावण दहनाच्यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला. या प्रकारामुळे देशातील राजकारण तापलं आहे. या प्रकारामागे काँग्रेसचा कट असल्याचा आरोप भाजपनं केला आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांनी या प्रकारावरून राहुल गांधी यांच्यावर घणाघाती आरोप केला आहे. नड्डा म्हणाले , पंजाबमध्ये जे काही केलं जात आहे ते राहुल गांधी यांच्या इशाऱ्यावरूनच होत आहे. हा प्रकार अत्यंत लज्जास्पद असल्याचं नड्डा यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा..परवानगी नसताना काढली पालखी, सेनेच्या आमदारासह 50 जणांविरोधात गुन्हा दाखल

या घटनेची माहिती मिळताच भाजपने काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी सांगितलं की, पंजाबमध्ये पीएम मोदी यांच्या प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात येतो, ही लज्जास्पद घटना आहे. राहुल गांधी यांनी दिलेल्या इशाऱ्यावरूनच काँग्रेसनचं ड्रामा केला आहे.

जेपी नड्डा यांनी म्हटलं की, नेहरू आणि गांधी घराण्यानं कधीही देशाच्या पंतप्रधान पदाचा आदर केला नाही. 2004-2014 दरम्यान यूपीएच्या कार्यकाळात पंतप्रधानपद संस्थात्मक पद्धतीने कमकुवत करण्यात आलं होतं.

दरम्यान, सरसंघचालक मोहन भागवत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दसरा मेळाव्यात भाषण करताना चीनशी संबंधित जे मत मांडलं त्यावर काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी आक्षेप घेतला आहे.

चीनने भारताच्या जमिनीवर ताबा मिळवला आहे, हे मोहन भागवत यांना माहित आहे. मात्र, ते सत्य स्वीकारण्यास तयार नाहीत, असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: October 26, 2020, 1:40 PM IST

ताज्या बातम्या