पंतप्रधान मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत 'फोन पे चर्चा', पाकवर अप्रत्यक्षरित्या साधला निशाणा

पंतप्रधान मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत 'फोन पे चर्चा', पाकवर अप्रत्यक्षरित्या साधला निशाणा

जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवल्यावरून भारत-पाकिस्तानदरम्यान वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात चर्चा झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 20 ऑगस्ट :  जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवल्यावरून भारत-पाकिस्तानदरम्यान वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात चर्चा झाल्याचे वृत्त समोर आले आहे.  पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi)यांनी डोनाल्ड ट्रम्प (President Donald Trump) यांच्यासोबत 'फोन पे चर्चा' केली. या संवादादरम्यान पंतप्रधान मोदींनी नाव न घेता पाकिस्तानवर निशाणा साधला. मोदींनी पााकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी भारताविरोधात केलेल्या विधानांचा अप्रत्यक्षरित्या उल्लेख केला. पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारताविरोधात हिंसाचार घडवण्यासाठी चिथावणीखोर भाषणं देणं योग्य नाही. यामुळे क्षेत्रीय शांततेला नुकसान पोहोचत आहे.   पंतप्रधान कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या तब्बल अर्धा तास चर्चा झाली. द्विपक्षीय आणि क्षेत्रीय शांततेच्या प्रश्नांवर दोघांमध्ये चर्चा झाली. पंतप्रधान मोदींनी ट्रम्प यांच्याशी चर्चेदरम्यान ओसाका (Osaka) येथील जी-20 शिखर (G-20 Summit)  संमेलनाचा देखील उल्लेख केला.

(वाचा : त्या कावळ्यांना इतर पक्षांच्या पिंजऱ्यातून पळवणारं कोण होतं? उद्धव ठाकरेंचा सवाल)

इमरान खानवर पंतप्रधान मोदींचा निशाणा

मिळालेल्या माहितीनुसार क्षेत्रीय शांततेसंदर्भात पंतप्रधान मोदी म्हणाले की, काही नेत्यांकडून भारतविरोधी भडकाऊ भाषणं केली जात आहेत. ज्यामुळे प्रदेशातील शांततेत बाधा निर्माण होत आहे. दहशतवाद आणि हिंसाचारमुक्त वातावरण आणि  सीमेपलीकडील दहशतवाद रोखण्यावरही त्यांनी यावेळी भाष्य केलं.

शिवाय गरिबी, निरक्षरता आणि आजारांविरोधात जर कोणताही देश लढा देत असेल तर भारत त्याच्यासोबत आहे, असं सांगत मोदींनी भारताच्या संकल्पांचा पुनरुच्चार केला.  दरम्यान, अफगाणिस्तानच्या स्वातंत्र्यास 100 वर्षे पूर्ण झाली, यावरही दोघांही संवाद साधला.

(पाहा : वर्दीवर पुन्हा हात उचलला, मुब्य्रात तरुणांचा पोलिसांवर हल्ला LIVE VIDEO)

दोन दिवसांपूर्वीच पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी ट्रम्प यांच्यासोबत फोनवरून संपर्क साधला होता. काश्मीर प्रश्न भारताशी द्विपक्षीय मार्गाने सोडवावा, असा सल्ला यावेळेस ट्रम्प यांनी त्यांना दिला होता.

(वाचा : प्रकाश आंबेडकर तुटेपर्यंत ताणणार, काँग्रेस राहणार का वंचित?)

जोड्यानं हाणलं पाहिजे, गिरीश महाजनांवर टीका करताना धनंजय मुंडेंची जीभ घसरली

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 20, 2019 08:36 AM IST

ताज्या बातम्या