अनस्टॉपेबल मोदी : पंतप्रधानांनी सलग काम करण्याचं केलं नवं रेकॉर्ड

अनस्टॉपेबल मोदी : पंतप्रधानांनी सलग काम करण्याचं केलं नवं रेकॉर्ड

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या कामात सतत व्यग्र असतात. त्यांचा दौरे, सभा, कार्यक्रम या सगळ्याला उपस्थिती लावण्याचा वेगही प्रचंड आहे. याचीच प्रचिती चांद्रयान -2 च्या निमित्ताने पुन्हा आली.

  • Share this:

बंगळुरू, 7 सप्टेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या कामात सतत व्यग्र असतात. त्यांचा दौरे, सभा, कार्यक्रम या सगळ्याला उपस्थिती लावण्याचा वेगही प्रचंड आहे. याचीच प्रचिती चांद्रयान -2 च्या निमित्ताने पुन्हा आली.

बंगळुरूमधल्या इस्रोच्या मुख्यालयात चांद्रयान - 2 मोहिमेच्या प्रत्येक घडामोडींचे साक्षीदार बनले. ज्या कसोटीच्या क्षणांमध्ये वैज्ञानिकांना भक्कम पाठिंब्याची गरज होती त्या क्षणी ते शास्त्रज्ञांसोबत होते. याआधी पंतप्रधान रशियाच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्याहून आल्यानंतर ते सरकारी कामांमध्ये व्यग्र झाले. नरेंद्र मोदी रशियाच्या व्लादिवोस्तोक शहरात इस्टर्न इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीनंतर दिल्लीला पोहोचले.

शुक्रवारी सकाळपासून त्यांनी केंद्राच्या वेगवेगळ्या योजना आणि उपक्रमांसाठी बैठका घेतल्या. दिवसभर सलग काम केल्यानंतर ते संध्याकाळी बंगळुरूला पोहोचले.

रशिया-दिल्ली-बंगळुरू-मुंबई-औरंगाबाद

बंगळुरूमध्ये इस्रोच्या वैज्ञानिकांसोबत चांद्रयान - 2 सगळे अपडेट्स घेतले.चांद्रयानच्या विक्रम लँडरचा संपर्क तुटल्यानंतर त्यांनी शास्त्रज्ञांना धीर दिला.

रात्रभर हे सगळे चढउतार पाहिल्यानंतर ते पुन्हा सकाळी बंगळुरूमधून निघाले. ठरलेल्या कार्यक्रमाप्रमाणे त्यांनी मुंबईतल्या मेट्रोच्या विकासाकामांचं भूमिपूजन केलं आणि एका सभेत मुंबईकरांना उद्देशून भाषणही केलं.

इस्त्रोच्या वैज्ञानिकांचं स्पिरिट मुंबईकरांसारखं - पंतप्रधान मोदी

यानंतर ते औरंगाबादला गेले. तिथे सभा आणि वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या नंतर ते दिल्लीला परतणार आहेत.

अशा प्रकारे सलग काम करून मोदींनी स्वत:चच रेकॉर्ड तोडलं आहे. पंतप्रधानांच्या या कार्यबाहुल्याबद्दल त्यांची सगळीकडे प्रशंसा होते आहे.

सरपंचाने केलेल्या अपमानामुळे दलित अधिकाऱ्याने केली आत्महत्या

======================================================================================

लाडक्या रॅम्बोला भेटायला पोहोचले राज ठाकरे, पाहा हा VIDEO

First published: September 7, 2019, 5:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading