बंगालमध्ये मोदी, 'या' एका कारणामुळे अवघ्या 14 मिनिटांत संपवलं भाषण

बंगालमध्ये मोदी, 'या' एका कारणामुळे अवघ्या 14 मिनिटांत संपवलं भाषण

मोदींची ही सभा एका वेगळ्याच कारणामुळे सध्या चर्चेत आहे. ते कारण म्हणजे मोदींनी या सभेत केवळ 14 मिनिटांत आपलं भाषण संपवलं.

  • Share this:

कोलकाता, 2 फेब्रुवारी : आगामी लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमध्ये सभा घेतली. या सभेत त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. पण मोदींची ही सभा एका वेगळ्याच कारणामुळे सध्या चर्चेत आहे. ते कारण म्हणजे मोदींनी या सभेत केवळ 14 मिनिटांत आपलं भाषण संपवलं.

भाजपने केलेल्या मोठ्या तयारीचा परिणाम हा होता की पंतप्रधान मोदींच्या या सभेसाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे सभा होत असलेल्या मैदानात चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली. ही परिस्थिती लक्षात घेत मोदींनी आपलं भाषण आटोपतं घेतलं.

'कार्यकर्त्यांच्या उत्साहामुळे मैदानात जागा कमी पडली आहे. यामुळे लोकांना अडचणी होऊ शकतात. कोणीही धक्काबुक्की करू नका,' असं म्हणत नरेंद्र मोदी यांनी आपलं भाषण लवकर संपवलं.

मोदींचा ममतांवर हल्लाबोल

'ही गर्दी पाहून माझ्या लक्षात आलं की ममता बॅनर्जी हिंसक का झाल्या आहेत. पश्चिम बंगालमधील लोकांचं आमच्या प्रती असलेलं प्रेम पाहूनच ममता बॅनर्जी घाबरल्या आहेत. यातून मग लोकशाही वाचवण्याचा आव आणत त्यांच्याकडून भाजपच्या कार्यकर्त्यांची हत्या केली जात आहे,' असं म्हणत मोदींनी ममता बॅनर्जी यांच्यावर जोरादार टीका केली.

VIDEO VIRAL : जयंत सिन्हा यांच्या मागे उभी राहून वाकुल्या दाखवणारी 'ती' मुलगी कोण?

First published: February 2, 2019, 4:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading