पंतप्रधान मोदींचा वाढदिवस भाजप 'सेवा दिवस' म्हणून करणार साजरा

पंतप्रधान मोदींचा वाढदिवस भाजप 'सेवा दिवस' म्हणून करणार साजरा

भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी याबाबतचे आदेश भाजपच्या सर्व शाखांना दिले आहेत. या दिवशी सर्व शाखांनी विविध सेवा उपक्रम राबवावे असे अमित शहा यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

  • Share this:

16 सप्टेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 17 सप्टेंबरचा वाढदिवस भाजप सेवा दिवस म्हणून साजरा करणार आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी याबाबतचे आदेश भाजपच्या सर्व शाखांना दिले आहेत. या दिवशी सर्व शाखांनी विविध सेवा उपक्रम राबवावे असे अमित शहा यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

काय आहे आदेशात ?

शहर आणि गावांमधल्या हॉस्पिटल, शाळा, बस स्टेशन्स, मोठया नेत्यांचे पुतळे यासारख्या सार्वजनिक महत्वाच्या ठिकाणी स्वच्छता अभियान राबवणे

झोपडपट्टी आणि दुर्गम भागात मेडिकल कॅम्पचं आयोजन

हे उपक्रम राबवताना समविचारी संघटनांची मदत घ्या

भाजपच्या वैद्यकीय विभागाने जिल्हास्तरावर किमान 2 शिबीरं घ्यावीत

गावपातळीवर वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबवावा

प्रत्येक लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनी या उपक्रमांमध्ये सहभागी व्हावं

राज्यसभा खासदार आणि परिषदेच्या आमदारांनी आपापल्या विभागातल्या उपक्रमांमध्ये सहभागी व्हावं

सर्व राज्यांनी जिल्हा आणि मंडलस्तरावर नियोजन करून कार्यक्रम पत्रिका तयार करावी

First published: September 16, 2017, 11:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading