मुंबई, 16 जानेवारी : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटरवर (Twitter) नेहमी सक्रीय असतात. ट्विटरवरील दोन अकाऊंट्सवरुन त्यांच्याबद्दलची अधिकृत माहिती सर्वांना मिळते. यापैकी पहिलं अकाउंट पंतप्रधान कार्यालय (PMO) हे आहे, तर दुसरं त्यांचं स्वत:चं अकाउंट आहे. शुक्रवारी एका युझरनं मंदिराचा एक फोटो टाकून सर्वांना चॅलेंज दिलं होतं. युझर्सच्या त्या चॅलेंजला पंतप्रधान मोदींनी उत्तर देऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.
काय होता प्रश्न?
लॉस्ट टेंपल्स (@LostTemple7) या ट्विटर अकाउंटवरुन एक फोटो शेअर करण्यात आला होता. नदीच्या घाटावरील मंदिराचा हा फोटो आहे. त्याचबरोबर गंगा नदीची आरती सुरु आहे. या भव्य फोटोसोबत त्या युझरनं लेखक मार्क ट्वेन यांनी या शहराचं वर्णन केलेले शब्द कॅप्शन म्हणून लिहिले होते.
‘इतिहासापेक्षा जुनं, परंपरेपेक्षा जुनं, दंतकथांपेक्षा जुनं आणि जेव्हा तुम्ही या दोन गोष्टी एकत्र करता तेव्हा त्यापेक्षाही जुनं हे शहर आहे. तुम्ही या शहराला ओळखू शकता का?’ असा प्रश्न या युझरनं विचारला होता.
"Older than history, older than tradition, older even than legend, and looks twice as old as all of them put together."
– Mark Twain on the great ancient of Bharat. Can you identity that great city.? Comment below 😊 pic.twitter.com/iY5cytEgVL — Lost Temples™ (@LostTemple7) January 15, 2021
मोदींनी दिलं उत्तर
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थोड्याच वेळात या प्रश्नाचं उत्तर देत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. ‘मला आठवतंय काही वर्षांपूर्वी मी हा फोटो शेअर केला होता. हे काशीमधील रत्नेश्वर महादेव मंदिर आहे’, असं उत्तर मोदींनी दिलं. त्यांचं हे उत्तर व्हायरल झालं आहे.
I surely can. :)
Had shared this picture a few years ago. This is Kashi's Ratneshwar Mahadev Temple, in its full glory. https://t.co/xp3u9iF1rH https://t.co/7NkPccOeYj — Narendra Modi (@narendramodi) January 15, 2021
Wonderful Dev Deepawali photos from Kashi! Have a look. pic.twitter.com/IjQXR52EHr
— Narendra Modi (@narendramodi) November 4, 2017
लॉस्ट टेंपल्स या अकाउंटला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फॉलो करतात. त्यांनी 2017 साली देव दिवाळीच्या दिवशी वाराणसीमधील काही फोटो शेअर केले होते. त्यामध्ये या फोटोचाही समावेश होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: PM Naredra Modi, Twitter