Home /News /national /

PM cares : कोरोनाविरोधातल्या लढाईसाठी पंतप्रधान मोदींनी केलं नवं आवाहन

PM cares : कोरोनाविरोधातल्या लढाईसाठी पंतप्रधान मोदींनी केलं नवं आवाहन

Coronavirus च्या महासाथीचा मुकाबला करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी नागरिकांना मदत करण्याचं आवाहन केलं आहे. त्यासाठी नव्या फंडाची घोषणा करण्यात आली आहे.

    नवी दिल्ली, 28 मार्च : Coronavirus च्या महासाथीचा मुकाबला करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी नागरिकांना मदत करण्याचं आवाहन केलं आहे. त्यासाठी Prime Minister’s Citizen Assistance and Relief in Emergency Situations Fund स्थापन करण्यात आला आहे. Covid-19 च्या लढाईसाठी बळ म्हणून ज्या नागरिकांना छोट्या -मोठ्या प्रमाणावर दान करायचं आहे त्यांनी PM Cares Fund ला आपलं योगदान द्यावं, असं आवाहन नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पंतप्रधान मोदींनी हे आवाहन केल्याबरोबर लगेचच बॉलिवूड स्टार अक्षय कुमार पुढे सरसावला आहे. आपण पंतप्रधानांच्या या फंडासाठी माझ्या पुंजीतून 25 कोटींचा निधी देण्याचं वचन देतो, असं Tweet अक्षयने केलं. मोदींनी त्याची लगेच दखल घेत आभार मानले आहेत. PM-CARES फंडाची घोषणा करताना पंतप्रधानांनी म्हटलं आहे की, कुठलीही छोटी रक्कम तुम्ही या फंडासाठी देऊ शकता. त्यासाठी SBI मध्ये PM Cares नावाच्या खात्यात निधी थेट जमा करायचा आहे. त्यासाठीचे अकाउंट डिटेल्सही पंतप्रधानांनी शेअर केले आहेत. कोरोनाशी लढा देण्यासाठी नक्कीच मोठ्या आर्थिक साहाय्याची गरज आहे. अशावेळी देशातील नामांकित व्यावसायिक आणि उद्योजकांनी मदतीचा हात पुढे सरसावला आहे. रिलायन्सच्या मुकेश अंबानी यांनी महाराष्ट्र मुख्यमंत्री सहाय्यचा निधीसाठी 5 कोटी रुपयांची मदत दिली आहे. याशिवाय काही NGOबरोबर पार्टनरशीप करत विविध शहरामध्ये मोफत अन्नदान केलं आहे. रिलायन्सने कोरोनाबाधित रुग्णांसाठी 100 बेडचं सेंटर मुंबईमध्ये सेव्हन हिल्स या हॉस्पिटलमध्ये तयार आहे. दोन आठवड्यात ते तयार करण्यात आले़ं आहे. महिंद्रा अँड महिंद्राच्या आनंद महिंद्रा यांनी अत्याधुनिक व्हेंटिलेटर तयार करण्याचं जाहीर केलं आहे. त्याची किंमत केवळ 7,500 रुपये इतकी असणार आहे.  कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाशी दोन हात करण्यासाठी मदत म्हणून उद्योगपती अनिल अग्रवाल यांनी 100 कोटी मदत करणार असल्याचं आश्वासन केलं आहे. अन्य बातम्या कोरोनापासून बचावासाठी सूट मिळेना, नर्सनी घातल्या कचऱ्याच्या पिशव्या; फोटो VIRAL 'सॉरी! काही लोक मरणारच, पण म्हणून देश बंद करायचा का?'
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या