S M L

आजपासून भाजपचा नवा पत्ता; दिल्लीत भाजपचं नवीन मुख्यालय

भाजपच्या नव्या मुख्यालयाचं थोड्याच वेळात पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. नवी दिल्लीच्या लुटेन्स भागात पंडित दीनदयाळ उपाध्याय मार्गावर ही नवी इमारत आहे.

Renuka Dhaybar | Updated On: Feb 18, 2018 12:21 PM IST

आजपासून भाजपचा नवा पत्ता; दिल्लीत भाजपचं नवीन मुख्यालय

18 फेब्रुवारी : भाजपच्या नव्या मुख्यालयाचं थोड्याच वेळात पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. नवी दिल्लीच्या लुटेन्स भागात पंडित दीनदयाळ उपाध्याय मार्गावर ही नवी इमारत आहे. सत्तेत असणाऱ्या पक्षाचं कायमस्वरूपी मुख्यालय असण्याची ही पहिलीच वेळ आहे. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांची सध्याची मुख्यालयं सरकारी इमारतींमध्ये आहेत. या नव्या इमारतीत अत्याधुनिक सोयीसुविधा आहेत.

2014मध्ये अमित शाह यांनी भाजपा अध्यक्षपदाचा पदभार स्विकारल्यापासून ते सर्व राज्ये आणि जिल्ह्यांमध्ये पक्षासाठी एक नवीन कार्यालय स्थापन करण्यासाठी कार्यरत होते. आणि अखेर या नव्या मुख्यालयाचं काम पूर्ण झालं आहे. पुढच्याच आठवड्यात या मुख्यालयात कामकाजाला सुरूवात होणार आहे.

 

भाजपचं नवं मुख्यालय

- मुख्यालयाला कॉर्पोरेट लुक

- वरिष्ठ नेत्यांची स्वतंत्र कार्यालयं

- मोठी सभागृहं

- बैठकींसाठी प्रशस्त खोल्या

- टीव्ही कार्यक्रमांमध्ये भाग घेण्यासाठी स्टुडिओ

- व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सोय

- मोठं आणि अत्याधुनिक वाचनालय

- जगभरातली वृत्तपत्रं, मासिकं उपलब्ध

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 18, 2018 11:10 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close