• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • 'कोरोना संकटकाळात योगाच ठरला आशेचा किरण'; योगा दिनानिमित्त पंतप्रधानांचा जनतेसोबत संवाद

'कोरोना संकटकाळात योगाच ठरला आशेचा किरण'; योगा दिनानिमित्त पंतप्रधानांचा जनतेसोबत संवाद

आज सातव्या आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त (International Yoga Day 2021) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi on Yoga Day) यांनी जनतेसोबत संवाद साधला. जगभरातील लोकांना आता योगाचं महत्तव समजतंय, असं त्यांनी यावेळी म्हटलं.

 • Share this:
  मुंबई 21 जून : आज सातव्या आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त (International Yoga Day 2021) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi on Yoga Day) यांनी जनतेसोबत संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी योगाचे फायदे आणि महत्तव सांगितले. कोरोनाकाळात योगाचा कशाप्रकारे फायदा झाला याबाबतही त्यांनी माहिती दिली. पंतप्रधान यावेळी बोलताना म्हणाले, की दोन वर्षापासून देशासह जगभरात मोठे सार्वजनिक कार्यक्रम आयोजित केले जात नसले तरी योगा दिवसाचा उत्साह कमी झालेला नाही. आज संपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असताना योग हा आशेचा किरण ठरला आहे. ते म्हणाले, की दुनियातील बहुतेक देशांसाठी योग दिवस त्यांच्यासाठी जुनं सांस्कृतिक पर्व नाही. मात्र, कोरोना महामारीच्या इतक्या कठीण काळातही लोक योगाला विसरलेले नाहीत. उलट लोकांचा योगाबाबतचा उत्साह अधिक वाढला. याबाबतचं प्रेम अधिक वाढलं. या कठीण काळात योगानं लोकांना विश्वास दिला की आपण या महामारीसोबत लढू शकतो. पंतप्रधानांनी यावेळी योगाच्या नव्या अॅपची घोषणाही केली. पंतप्रधान पुढे म्हणाले, की डॉक्टर आणि फ्रंटलाईन वर्करनंही योगाला आपलं सुरक्षाकवच बनवलं. योग आणि व्यायामामुळे चांगलं आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभतं. चांगलं आरोग्यच सर्व यशाचं माध्यम असल्याचं त्यांनी म्हटलं. तसंच योगामुळे शारिरीक आरोग्यासोबत मानसिक आरोग्यावरही सकारात्मर परिणाम होतो. योगामुळे आपल्याला आपली विचारशक्ती समजते. योग आपल्याला निगेटिव्हीटीकडून क्रिएटिव्हीकडे घेऊन जातो, असंही पंतप्रधान म्हणाले.
  Published by:Kiran Pharate
  First published: