मराठी बातम्या /बातम्या /देश /PM Modi Diwali Celebrations: नौशेरामध्ये पंतप्रधानांची दिवाळी; जवानांच्या शौर्याला सलाम, सर्जिकल स्ट्राईकचाही उल्लेख

PM Modi Diwali Celebrations: नौशेरामध्ये पंतप्रधानांची दिवाळी; जवानांच्या शौर्याला सलाम, सर्जिकल स्ट्राईकचाही उल्लेख

PM Modi Diwali Celebrations:  पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू काश्मीरच्या (Jammu and Kashmir) नौशेरामध्ये (Nowshera) जवानांसोबत दिवाळी साजरी केली आहे.

PM Modi Diwali Celebrations: पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू काश्मीरच्या (Jammu and Kashmir) नौशेरामध्ये (Nowshera) जवानांसोबत दिवाळी साजरी केली आहे.

PM Modi Diwali Celebrations: पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू काश्मीरच्या (Jammu and Kashmir) नौशेरामध्ये (Nowshera) जवानांसोबत दिवाळी साजरी केली आहे.

श्रीनगर, 04 नोव्हेंबर: PM Modi Diwali Celebrations: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) जम्मू काश्मीरच्या (Jammu and Kashmir) नौशेरामध्ये (Nowshera) जवानांसोबत दिवाळी साजरी केली आहे. पंतप्रधान मोदींनी जवानांना (Prime Minister Modi addressed) संबोधित केलं. जवानांना दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या. नौशेरा सेक्टरमध्ये त्यांनी शहिदांना श्रद्धांजलीही अर्पण केली. यावेळी त्यांनी सर्जिकल स्ट्राईक (surgical strike) चाही उल्लेख केला. तसंच त्यांनी जवानांची तोंडभरून स्तुती केली.

हेच आपलं कुटुंब असून आपल्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करत असल्याची भावना यावेळी पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली. याआधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि आता पंतप्रधान म्हणून आपली प्रत्येक दिवाळी आपण याच कुटुंबासोबत साजरी केली असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. नौशेराचे जवान शूर आहेत. जेव्हा जेव्हा शत्रूने आपल्या भूमीवर पाऊल ठेवलं. तेव्हा तेव्हा त्यांना जवानांनी जशास तसं प्रत्युत्तर दिलं असल्याचं मोदी म्हणालेत.

सर्जिकल स्ट्राईकच्या आठवणींना उजाळा

नौशेरामध्ये तैनात जवानांच्या शौर्याचं वर्णन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्जिकल स्ट्राईकच्या आठवणींना उजाळा दिला. उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यांनंतर भारतीय लष्करानं पाकिस्तानच्या सीमेत घुसून सर्जिकल स्ट्राईक केला होता. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, नेहमीच नौशेराच्या जवानांनी शत्रुला चोख उत्तर दिलं आहे. सर्जिकल स्ट्राइकमध्ये नौशेराच्या जवानांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती. नौशेराच्या भूमीवर किती वीरांनी आपल्या रक्तानं आणि परिश्रमानं शौर्याची गाथा लिहिली आहे.

पुढे पंतप्रधान म्हणाले की, सर्जिकल स्ट्राईकमध्ये नौशेरामधल्या ब्रिगेडनं जी भूमिका निभावली, ती प्रत्येक भारतीयाला गर्व वाटणारी आहे. सर्जिकल स्टाइकनंतर येथे अशांती पसरवण्याचे अनेक प्रयत्न झाले. मात्र प्रत्येक वेळी दहशतवादाला चोख प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. असं म्हणतात, की पांडवांनीही अज्ञातवासाच्या दरम्यान आपला काही काळ इथे घालवला होता, असं पंतप्रधान म्हणाले आहेत.

हेही वाचा- VIDEO: VIP रुटशिवाय पंतप्रधानांनी केला जम्मूचा प्रवास, सिग्नलवरही थांबला ताफा

130 कोटी देशवासियांचे आशीर्वाद तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. आपले जवान सीमेवर डोळ्यात तेल घालून पाहरा देत असतात. त्यामुळेच संपूर्ण देश सुखाची झोप घेऊ शकतं. आपले जवान म्हणजेच आपलं अभेद्य असं संरक्षण कवच आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणालेत. जवानांमुळेच देशात शांती आणि सुरक्षा बनलेली आहे. आपले जवान म्हणजे त्याग आणि शौर्याचं मूर्तीमंत उदाहरण आहेत, असं पंतप्रधान म्हणालेत.

तुमच्याकडून ऊर्जा, नवी उमेद आणि नवा विश्वास घेण्यासाठी मी आज पुन्हा आलो आहे. मी केवळ एकटाच तुमच्याकडे आलो नाही. तर 130 कोटी भारतीयांच्या शुभेच्छा घेऊन आलोय, असंही पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.

आज एक दिवा जवानांच्या शौर्यासाठी

आज संध्याकाळी भारताचा प्रत्येक नागरिक दिवाळीनिमित्ताने एक दिवा लावून तुमच्या वीरत्वासाठी, तुमच्या शौर्यासाठी, तुमच्या पराक्रमासाठी लावून तुम्हाला अनेकानेक शुभकामना देईल. तुमच्या कर्तृत्वाला सलाम करेल, असं मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशाच्या सुरक्षेच्या क्षेत्रात महिलांची भूमिका नवीन उंची गाठत आहे. महिलांना आता लष्करात कायमस्वरूपी कमिशन दिले जात आहे. मोठ्या लष्करी संस्थांचे दरवाजेही आता महिलांसाठी खुले झाले आहेत.

First published:

Tags: Jammu and kashmir, Narendra modi