180 सेकंदात पाडलं सॅटेलाईट, मोदींच्या भाषणातील 10 मुद्दे

180 सेकंदात पाडलं सॅटेलाईट, मोदींच्या भाषणातील 10 मुद्दे

पंतप्रधान मोदी यांनी एकाच वेळी टीव्ही, रेडिओ, सोशल मीडियावरुन दिला संदेश

  • Share this:

नवी दिल्ली, 27 मार्च : अमेरिका, रशिया, चीननंतर अंतराळातील महाशक्ती ठरलेला भारत चौथा देश ठरला आहे. लो अर्थ ऑरबीटला भारतानं पाडलं. फक्त तीन मिनिटांत ही कामगिरी पूर्ण करण्यात आली.

- मिशन शक्तीच्या अंतर्गत करण्यात आलेल्या कारवाईत A सॅटने ही कामगिरी केली.

- याबद्दल पंतप्रधान मोदींनी या मोहिमेशी संबंधित सर्व वैज्ञानिकांचं अभिनंदन केलं.

- भारतानं सर्वच क्षेत्रात प्रगती करताना आता अंतराळातही महाशक्ती झाला आहे.

- भारतीयांसाठी हा गौऱवाचा दिवस असून देशाला एक मोठी ताकद दिली आहे.

- देशाची संरक्षणातील ताकद वाढली आहे.

भाषणापूर्वीच्या घडामोडी

- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला दुपारी 12 वाजता संदेश देणार होते.

- सर्व मंत्र्यांचे फोन बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

- पंतप्रधान करणार असलेल्या घोषणेचा निवडणुकीशी संबंध जोडू नये असं म्हटलं जात आहे.

- यापूर्वी निवडणूक आयोगाशी पंतप्रधान कार्यालयाची चर्चा सुरु आहे.

- निवडणूक आयोग देशवासीयांशी चर्चा करण्यासाठी परवानगी देईपर्यंत पंतप्रधान मोदींना संदेश देता आला नाही.

- देशातील नागरिकांशी संवाद साधणार असल्याचे पंतप्रधान मोदींनी ट्विटरवर सांगितले होते. माझ्या देशवासीयांनो आज मी सकाळी 12 च्या दरम्यान एक महत्त्वाचा संदेश देणार आहे. हे तुम्ही टीव्ही, रेडिओ आणि सोशल मीडियावर पाहू शकता.

सहा भाषेत बोलते धोनीची लेक; पाहा बाप-लेकीचा 'हा' VIDEO

First published: March 27, 2019, 12:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading