पावणे सहा कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले 4 हजार, तुम्हीही अकाऊंट चेक करा

या योजनेत उत्तर प्रदेशातल्या शेतकऱ्यांना सर्वात जास्त फायदा मिळाला. मात्र नवी दिल्ली, लक्षव्दीप आणि पश्चिम बंगालमधल्या एकही शेतकऱ्याला याचा फायदा झाला नाही

News18 Lokmat | Updated On: Jul 22, 2019 09:02 PM IST

पावणे सहा  कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले 4 हजार, तुम्हीही अकाऊंट चेक करा

नवी दिल्ली 22 जुलै : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीआधी पंतप्रधान किसान सन्मान योजनेची घोषणा केली होती. त्यानुसार पावणे सहा कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात चार हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. पण आणखी नऊ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात ते पैसे जमा होणं बाकी आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकले नाही. त्यांच्यासाठी सरकारने हेल्पलाईन तयार केलीय. ज्या शेतकऱ्यांना अडचण असेल ते या हेल्पलाईन नंबरवर संपर्क करू शकतात.

नवी दिल्लीत कृषी मंत्रालयात PM-KISAN Help Deskच्या pmkisan-ict@gov.in या ईमेलवर संपर्क करू शकतात किंवा Direct HelpLine 011-23381092 या नंबरवरही थेट फोन करू शकतात. इथे शेतकऱ्यांनी तक्रार केल्यास संबंधीत विभागाकडे ती तक्रार सोडविण्यासाठी पाठपुरावा केला जातो.

काश्मीरात धडक कारवाई, सुरक्षा दलाला सापडला दहशतवाद्यांचा गुप्त शस्त्रसाठा

या योजनेत उत्तर प्रदेशातल्या शेतकऱ्यांना सर्वात जास्त फायदा मिळाला. मात्र नवी दिल्ली, लक्षव्दीप आणि पश्चिम बंगालमधल्या एकही शेतकऱ्याला याचा फायदा झाला नाही, कारण त्या राज्य सरकारांनी शेतकऱ्यांची यादीच केंद्राकडे पाठवलेली नाही. राजकीय कारणांमुळे या राज्यसरकारांनी ही यादी केंद्राला दिली नाही.

या राज्यांना झाला सर्वाधीक फायदा

Loading...

Chandrayaan-2: दक्षिण ध्रुवावरच का जातोय आपण? ISRO करणार डार्क साइडचं रहस्यभेद!

उत्तर प्रदेश 1.50 कोटी, गुजरात 38.34 लाख, हरियाणा 1.95 लाख, महाराष्ट्र 52.44 लाख आणि उत्तराखंड 4.8 लाख शेतकऱ्यांना फायदा झाला. बिहार 18.42 लाख, कांग्रेस शासित पंजाब 13.38 लाख, मध्य प्रदेश 4.68 लाख, राजस्थान 29.34 लाख, गैर कांग्रेसी तेलंगाना 30.44 लाख आणि ओडिशा 28.23 लाख शेतकऱ्यांना फायदा मिळालाय.

पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवा तुमच्या कल्पना

15 ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनाला आता एक महिन्यापेक्षाही कमी अवधी राहिला आहे. यावर्षी पंतप्रधान मोदी सहाव्यांदा लालकिल्ल्यावरून भाषण करणार आहेत. या ऐतिहासिक प्रसंगी पंतप्रधानांच्या भाषणात काय मुद्दे असावेत याबद्दलच्या सूचना त्यांनी नागरिकांकडे मागवल्या आहेत.

देशातल्या या मोठ्या सरकारी बँकेत नोकरीची संधी, असा करा अर्ज

याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीट केलं आहे. 15 ऑगस्टच्या भाषणासाठी तुमच्या बहुमूल्य सूचना तुम्ही आम्हाला पाठवू शकता. या सूचनांचा अंतर्भाव भाषणामध्ये करण्यात आम्हाला आनंदच वाटेल, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. जर तुम्ही सूचना पाठवल्यात तर लालकिल्ल्यावरून पंतप्रधानांच्या भाषणाच्या रूपात 130 कोटी भारतीय तुमचे विचार ऐकतील, असंही यात लिहिलं आहे.या भाषणासाठीच्या सूचना नमो अ‍ॅपवर तयार करण्यात आलेल्या ओपन फोरममध्ये पाठवायच्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 22, 2019 09:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...