आता तुमच्याही कल्पनेला मिळेल मोदींच्या 15 ऑगस्टच्या भाषणात स्थान, अशा करू शकता सूचना

15 ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनाला आता एक महिन्यापेक्षाही कमी अवधी राहिला आहे. यावर्षी पंतप्रधान मोदी सहाव्यांदा लालकिल्ल्यावरून भाषण करणार आहेत. या ऐतिहासिक प्रसंगी पंतप्रधानांच्या भाषणात काय मुद्दे असावेत याबद्दलच्या सूचना त्यांनी नागरिकांकडे मागवल्या आहेत.

News18 Lokmat | Updated On: Jul 19, 2019 03:22 PM IST

आता तुमच्याही कल्पनेला मिळेल मोदींच्या 15 ऑगस्टच्या भाषणात स्थान, अशा करू शकता सूचना

नवी दिल्ली, 19 जुलै : 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनाला आता एक महिन्यापेक्षाही कमी अवधी राहिला आहे. यावर्षी पंतप्रधान मोदी सहाव्यांदा लालकिल्ल्यावरून भाषण करणार आहेत. या ऐतिहासिक प्रसंगी पंतप्रधानांच्या भाषणात काय मुद्दे असावेत याबद्दलच्या सूचना त्यांनी नागरिकांकडे मागवल्या आहेत.

याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीट केलं आहे. 15 ऑगस्टच्या भाषणासाठी तुमच्या बहुमूल्य सूचना तुम्ही आम्हाला पाठवू शकता. या सूचनांचा अंतर्भाव भाषणामध्ये करण्यात आम्हाला आनंदच वाटेल, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. जर तुम्ही सूचना पाठवल्यात तर लालकिल्ल्यावरून पंतप्रधानांच्या भाषणाच्या रूपात 130 कोटी भारतीय तुमचे विचार ऐकतील, असंही यात लिहिलं आहे.या भाषणासाठीच्या सूचना नमो अ‍ॅपवर तयार करण्यात आलेल्या ओपन फोरममध्ये पाठवायच्या आहेत.

मन की बात

पंतप्रधान नरेंद्र मोदी याआधी मन की बात या कार्यक्रमातून नागरिकांशी संवाद साधत आले आहेत. त्यामुळे या मन की बात कार्यक्रमाचा आढावाही ते घेत आहेत. पंतप्रधानांना जनतेने कळवलेल्या विचारांची नोंद ते घेत असतात आणि मन की बात या कार्यक्रमातून याबद्दल ते विस्ताराने बोलतात.

चंद्रावर पहिलं पाऊल ठेवल्यानंतर मागितली होती इंदिरा गांधींची माफी!

दुसऱ्या टर्ममधलं पहिलं भाषण

लोकसभा निवडणुकीतल्या विजयानंतर पंतप्रधानांचं हे 15 ऑगस्टचं पहिलंच भाषण आहे. त्यामुळे त्यांच्या या भाषणाबदद्ल सगळ्यांनाच उत्सुकता आहे. याआधी 72 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधानांनी सरकारच्या कामगिरीचा आढावा घेतला होता. उद्योग, शेती, विज्ञान या क्षेत्रांत भारताने चांगली प्रगती केली आहे, असं त्यांनी सांगितलं होतं. आता या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पंतप्रधान कोणत्या विषयांवर भर देतात याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं आहे.

=================================================================================================

VIDEO: पहिलंच धरणं आंदोलन करणाऱ्या प्रियांका गांधींना पोलिसांनी घेतलं ताब्यात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 19, 2019 03:16 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...