पाकिस्तानला झाली उपरती, इम्रान खान यांनी ठेवला भारतापुढे चर्चेचा प्रस्ताव

'आम्हाला युद्ध नको शांतता पाहिजे, युद्धाने कुणाचही भलं झालं नाही.'

News18 Lokmat | Updated On: Feb 27, 2019 04:20 PM IST

पाकिस्तानला झाली उपरती, इम्रान खान यांनी ठेवला भारतापुढे चर्चेचा प्रस्ताव

इस्लामाबाद 27 फेब्रुवारी : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी एक व्हिडीयो संदेश देत भारतापुढे चर्चेचा प्रस्ताव मांडला. युद्धाने कुठल्याही देशाचं भलं झालं नाही. युद्धाचा शेवट हा विनाशच असतो असं सांगत त्यांनी पाकिस्तानने आज सकाळी केलेल्या हल्ल्याच्या प्रयत्नाचं समर्थन केलं.


इम्रान खान यांचा हा व्हिडीयो एडिट करून लावण्यात आला होता. पाकिस्तानला कुठल्या नागरी किंवा लष्करी तळावर हल्ला करायचा नव्हता तर फक्त आपली शक्ती दाखवायची होती असंही ते म्हणाले. भारताचे दोन पायलट आमच्या ताब्यात आहेत असा दावा इम्रान खान यांनी केला. पुलवामा हल्ल्यानंतर आम्ही पुरावे देण्याची मागणी केली होती. मात्र भारताने पुरावे दिले नाही, उलट पाकिस्तानच्या हद्दीत येवून हल्ले केले.


परिस्थिती अशीच चिघळत राहिली तर माझ्या आणि नरेंद्र मोदी यांच्या हातातही काही राहणार नाही असंही त्यांनी सांगितलं. आम्ही सर्व विषयावर चर्चा करण्यास तयार आहोत असं सांगत त्यांनी भारतापुढे चर्चेचा प्रस्ताव ठेवला.

Loading...


भारताची भूमिका


भारत आणि पाकिस्तानमधल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्रमंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. पाकिस्तानचे सर्व दावे फेटाळून लावत त्यांनी भारताने पाकिस्तानचे एक लढाऊ विमान पाडल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.


काय म्हणाले रवीश कुमार?


"सोमवारी भारताने जैश ए मोहम्मदच्या तळावर हल्ला करत तो तळ नष्ट केला. भारताची ही दहशतवादाविरोधातली कारवाई होती. आज  पाकिस्तानने भारताच्या लष्करी तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्याला चोख उत्तर देत भारताने पाकिस्तानचे एक लढाऊ विमान  पाडले आहे.  पाकिस्तानच्या हद्दीत हे विमान पाडण्यात आले. या हवाई भारताने मीग 21 हे विमान गमावले आहे. यात विमानाचा पायलट बेपत्ता असून त्याचा शोध आम्ही घेत आहोत." अशी माहिती परराष्ट्रमंत्रालयाचे प्रवक्ते रविश कुमार यांनी दिली."

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 27, 2019 04:20 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...