मराठी बातम्या /बातम्या /देश /

कोरोनाने हिरावलं आई-बाबांचं छत्र; कोविडमुळे अनाथ झालेल्या चिमुकल्यांसाठी मोदी सरकार बनलं मायबाप

कोरोनाने हिरावलं आई-बाबांचं छत्र; कोविडमुळे अनाथ झालेल्या चिमुकल्यांसाठी मोदी सरकार बनलं मायबाप

हरियाणामध्ये 2 ऑगस्टपासून 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू केले होते. मात्र तिथंही शाळांमध्ये काही विद्यार्थी कोरोनाबाधित आढळल्यानं सरकार पुन्हा कडक निर्बंध लागू करत आहे. लहान मुलांमध्ये संसर्गाचं प्रमाण वाढत असल्यानं शाळा, कॉलेजेस सुरू करण्याबाबत राज्य सरकारं फेरविचार करत आहेत.

हरियाणामध्ये 2 ऑगस्टपासून 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू केले होते. मात्र तिथंही शाळांमध्ये काही विद्यार्थी कोरोनाबाधित आढळल्यानं सरकार पुन्हा कडक निर्बंध लागू करत आहे. लहान मुलांमध्ये संसर्गाचं प्रमाण वाढत असल्यानं शाळा, कॉलेजेस सुरू करण्याबाबत राज्य सरकारं फेरविचार करत आहेत.

कोविडमुळे अनाथ झालेल्यांची (children orphaned by covid) संपूर्ण जबाबदारी आता मोदी सरकारने घेतली आहे.

  • Published by:  Priya Lad

नवी दिल्ली, 29 मे : कोरोनामुळे अनेकांनी आपल्या प्रिय आणि जवळच्या व्यक्तींना गमावलं आहे. अनेक चिमुकल्यांच्या डोक्यावरील आई-बाबाचं छत्र (Children who lost their parents due to Covid) हरपलं आहे. कोरोनामुळे आई आणि वडील दोघांचाही मृत्यू झाला आहे. दोन्ही पालकांना लहान मुलांपासून त्यांच्या आईवडिलांना कोरोनाने हिरावून (Covid affected children) घेतलं आहे. कोरोनामुळे अनाथ झालेल्या अशा मुलांच्या भविष्याचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. दरम्यान अशा अनाथ मुलांची (children orphaned by covid) जबाबदारी आता मोदी सरकारने घेतली आहे.

कोविड -19 मुळे पालक गमावलेल्या मुलांना आधार देण्यासाठी कोणती पावलं उचलावी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. सध्याच्या कोविड महासाथीचा फटका बसलेल्या मुलांच्या शिक्षण, आरोग्य आणि व्यवसायाची संपूर्ण जबाबदारी मोदी सरकारने घेतली आहे. पीएम केअर्स फॉर चिल्ड्रेन (PM CARES For Children) ही कोविड बाधित मुलांना आधार मिळण्यासाठी आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी योजना सुरू करण्यात आली आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले, मुलं देशाच्या भवितव्याचं प्रतिनिधित्व करतात आणि मुलांना आधार देण्यासाठी, त्यांचं संरक्षण करण्यासाठी देश सर्वतोपरी प्रयत्न करेल, जेणेकरून ते बलवान नागरिक म्हणून विकसित होतील आणि त्यांचं भविष्य उज्ज्वल असेल. अशा कठीण काळात  कोरोनाच्या कठीण काळात आपल्या मुलांची काळजी घेणं आणि उज्ज्वल भविष्याची आशा बाळगणं हे आपले आपल्या मुलांची काळजी घेणे आणि उज्ज्वल भविष्याची आशा बाळगणे हे आपले कर्तव्य आहे.

हे वाचा - गेल्या 24 तासांत राज्यातील रुग्णसंख्येत मोठी घट; मृत्यूचा आकडा मात्र चिंताजनक

कोविड 19 मुळे, दोन्ही पालक किंवा पालनपोषण करणारे किंवा कायदेशीर पालक / दत्तक पालक गमावलेल्या मुलांना 'पीएम-केअर्स फॉर चिल्ड्रेन' योजनेंतर्गत पाठिंबा दिला जाईल. पीएम-केअर्स निधीत केलेल्या उदार योगदानामुळेच या उपाययोजना शक्य झाल्या आहेत आणि त्या कोविड -19 विरुद्धच्या भारताच्या लढ्यास समर्थन देतील असेही त्यांनी सांगितले.

मुलाच्या नावे मुदत ठेव

मुलगा किंवा मुलगी 18 वर्षांची झाल्यावर त्या प्रत्येकासाठी दहा लाख रुपयांचा निधी उभारण्यासाठी विशेष रचना केलेल्या योजनेत पीएम केअर्स योगदान देईल. हा निधी उच्च शिक्षणाच्या कालावधीत त्याची किंवा तिची वैयक्तिक आवश्यकता पूर्ण करण्यासाठी 18 वर्षांपासून पुढील पाच वर्षांसाठी मासिक आर्थिक पाठिंबा / छात्रवृत्ती देण्यासाठी वापरला जाईल आणि 23 व्या वर्षात पदार्पण केल्यावर त्याला किंवा तिला वैयक्तिक आणि व्यावसायिक वापरासाठी एक रकमी निधीची रक्कम मिळेल.

शालेय शिक्षण : 10 वर्षाखालील मुलांसाठी

मुलाला जवळच्या केंद्रीय विद्यालयात किंवा खासगी शाळेत डे स्कॉलर म्हणून प्रवेश दिला जाईल. मुलास खासगी शाळेत प्रवेश मिळाल्यास आरटीईच्या निकषांनुसार फी पीएम केअर्स मधून दिली जाईल. गणवेश, पाठ्यपुस्तके आणि वह्यांच्या खर्चासाठी देखील पीएम केअर्स मधून पैसे दिले जातील.

शालेय शिक्षण : 11-18 वर्षांच्या मुलांसाठी

मुलाला सैनिक स्कूल, नवोदय विद्यालय इ. सारख्या कोणत्याही केंद्र शासकीय निवासी शाळांमध्ये प्रवेश देण्यात येईल. जर मूल काळजीवाहू पालक / आजी-आजोबा / वाढीव कुटुंबाच्या देखरेखीखाली असेल तर त्याला जवळच्या केंद्रीय विद्यालयात किंवा खासगी शाळेत डे स्कॉलर म्हणून प्रवेश दिला जाईल.

हे वाचा - आता राज्यांना स्वतः कंपनीकडून विकत घ्यावं लागणार रेमडेसिवीर; केंद्र नाही करणार..

मुलास खासगी शाळेत प्रवेश मिळाल्यास आरटीईच्या निकषांनुसार फी पीएम केअर्स मधून दिली जाईल.

गणवेश, पाठ्यपुस्तके आणि वह्यांच्या खर्चासाठी देखील पीएम केअर्स मधून पैसे दिले जातील.

उच्च शिक्षणासाठी समर्थन

मुलास सध्याच्या शैक्षणिक कर्जाच्या निकषांनुसार देशातील व्यावसायिक अभ्यासक्रम / उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज मिळविण्यात मदत केली जाईल. या कर्जावरील व्याज पीएम केअर्सद्वारे भरलx जाईल. केंद्र किंवा राज्य सरकारच्या योजनेंतर्गत अशा मुलांना मुलांना शासकीय निकषांनुसार पदवीधर / व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक शुल्क / कोर्स फी इतकीच शिष्यवृत्ती देण्याचा पर्याय आहे. विद्यमान शिष्यवृत्ती योजनेंतर्गत पात्र नसलेल्या मुलांसाठी, पंतप्रधान केअर्स मधून सममूल्य शिष्यवृत्ती दिली जाईल.

आरोग्य विमा

5 लाख रुपयांच्या आरोग्य विमा कवचासह सर्व मुलांची आयुष्मान भारत (पीएम-जेएवाय) योजनेअंतर्गत लाभार्थी म्हणून नोंदणी केली जाईल.

या मुलांची प्रिमिअम रक्कम 18 वर्षे वयापर्यंत पंतप्रधान केअर्सद्वारे दिली जाईल.

First published:

Tags: Coronavirus, Covid-19, PM narendra modi, Small child