पत्रकाराच्या थेट प्रश्नावर भडकले भाजप खासदार, म्हणाले.. अर्धवट माहिती धोकादायक

पत्रकाराच्या थेट प्रश्नावर भडकले भाजप खासदार, म्हणाले.. अर्धवट माहिती धोकादायक

भाजपचे नेते आणि खासदार अनुराग ठाकूर यांना भाजपच्या नेत्यांच्या दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या काळातील आक्रमक विधानाबद्दल एका पत्रकाराने छेडलं असता, ते चांगलेच संतापले.

  • Share this:

चंदीगड,(पंजाब)1 मार्च, भाजपचे नेते आणि खासदार अनुराग ठाकूर यांना भाजपच्या नेत्यांच्या दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या काळातील आक्रमक विधानाबद्दल एका पत्रकाराने छेडलं असता, ते चांगलेच संतापले. 'ज्यांच्यामुळे दिल्लीतील हिंसाचार भडकला, त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे' अशी मागणी ठाकूर यांनी केली आहे. दिल्लीमध्ये गेल्या काही दिवसात झालेल्या हिंसेच्या घटना पाहता या प्रकरणातल्या दोषींवर कठोर कारवाईची मागणी देखील अनुराग ठाकूर यांनी केली.

दिल्लीतल्या हिंसाचारात 40 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अर्थ आणि कॉर्पोरेट विभागाचे राज्यमंत्री असलेल्या अनुराग ठाकूर यांच्या उपस्थितीत उद्योग क्षेत्रातल्या मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम आयोजित करणयात आला होता. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रचारादरम्यानच्या वादग्रस्त विधानबद्दल ठाकूर यांना पत्रकारांनी छेडलं. यावेळी आक्रमक झालेल्या ठाकूर यांनी पत्रकारांनी अपूर्ण माहितीच्या आधारावर बोलू नये, असं सुनावलं. इतकंच नाही प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराची माहिती अपूर्ण असल्याचा दावा सुद्धा ठाकूर यांनी यावेळी केला.

हेही वाचा..मोदी-शहांवर हल्लाबोल करत शरद पवारांनी मुंबईत भाजपवर केला गंभीर आरोप

हिंसा नको शांतता हवी-ठाकूर

ठाकूर यांना दिल्लीतल्या दंगलींबद्दल विचारलं असता, 'जे कोणी दिल्लीतल्या हिंसाचारात सहभागी होते त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. देशात आणि दिल्लीत विविध धर्माचे लोकं गुण्यागोविंदाने एकत्र राहतात. सगळ्यांच्या सामूहिक योगदानामुळे देशाने आजपर्यंतची प्रगती केली आहे.' असं ठाकूर यांनी सांगितलं. दिल्लीत पोलिस त्यांचा काम योग्य पद्धतीने करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अनुराग ठाकूर यांना त्यांच्या वादग्रस्त विधानाबद्दल विचारण्यात आलं होतं.

काय म्हणाले अनुराग ठाकूर?

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading