दुधाची पिशवी परत द्या; मिळवा इतके पैसे

दुधाची पिशवी परत द्या; मिळवा इतके पैसे

Plastic Ban : राज्यात आता दुधाच्या पिशव्यांबाबत देखील राज्य सरकार नवं धोरण आखत आहे.

  • Share this:

मुंबई, विवेक कुलकर्णी, 27 जून : राज्य सरकारनं प्लॅस्टिक बंदी केल्यानंतर नागरिकांकडून त्याला चांगला प्रतिसाद देखील मिळाला. शिवाय, प्लॅस्टिक पिशवी वापरणाऱ्यांना दंड देखील आकारला गेला. त्यानंतर आता दुधाच्या प्लॅस्टिक पिशव्यांवरील बंदी महिनाभरात लागू होईल अशी माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी विधानसभेत दिली. दुधाची पिशवी घेताना 50 पैसे डिपॉझिट घ्यायचे आणि पिशवी परत दिल्यानंतर 50 पैसे परत द्यायचे अशी योजना सर्व दुध कंपन्यांनी मान्य केली आहे. एका महिन्यात ही योजना सुरू होईल अशी माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी विधानसभेत दिली. राज्यात दिवसाला १ कोटी दुधाच्या प्लॅस्टिक पिशव्या रस्त्यावर येतात. त्यामुळे 31 टन प्लॅस्टिक कचरा निर्माण होत असल्याची माहिती देखील यावेळी रामदास कदम यांनी दिली.

‘कुत्रा तुम्हाला चावला तर तुम्ही कुत्र्याला चावयचं’; डॉक्टरांचा सल्ला

विधानसभेत दुधाच्या पिशव्यांचा प्रश्न

राज्यात प्लॅस्टिक बंदी लागू झाली. पण, दुधासाठी प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर सुरू असल्याकडे विधानसभेत काही आमदारांनी पर्यावरण मंत्री रामदास कदमांचे लक्ष वेधले. त्यावर उत्तर देताना पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दुधाच्या प्लॅस्टिक पिशव्यांवरील बंदी महिनाभरात लागू होईल अशी माहिती दिली.

राज्यात 1200 टन प्लॅस्टिक कचरा निर्माण होत होता. प्लॅस्टिक बंदीनंतर कचरा निर्मितीमध्ये घट होऊन तो 600 टन झाला. राज्यात 1 लाख 20 हजार 286 टन प्लॅस्टिक जप्त केलं करण्यात आले असून 24 कंपन्या दिवसाला 550 टन प्लॅस्टिकवर प्रक्रिया करतात. तर, सिमेंट कंपन्यांना 3000 हजार टन प्लॅस्टिक वापरायला दिले असल्याची माहिती कदम यांनी दिली. शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी राज्यात अद्याप प्लॅस्टिकचा वापर सर्रास केला जात असल्याचा दावा केला. विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी देखील प्लॅस्टिकच्या वापरावर प्रश्न उपस्थित केले.

विदर्भ-मराठवाड्यात पावसाची दांडी, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 घडामोडी

First Published: Jun 27, 2019 01:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading