भारतीय वायुसेनेचं विमान कोसळलं; 5 जणांचा मृत्यू

भारतीय वायुसेनेचं विमान कोसळलं; 5 जणांचा मृत्यू

आज सकाळी साडेसहा वाजता हे विमान तवांग भागावरून उडत होतो. या विमानातून सात लोकं प्रवास करत असल्याची माहिती मिळते आहे. त्यातील 5 लोकांचा जागीच मृत्यू झाला आहे

  • Share this:

तवांग, 06 ऑक्टोबर: भारतीय वायुसेनेचं विमान आज सकाळी अरुणाचल प्रदेशच्या तवांग भागात कोसळलं आहे. या विमान दुर्घटनेत 5 लोकांचा मृत्यू झाला आहे.

आज सकाळी साडेसहा वाजता हे विमान तवांग भागावरून उडत होतो. या विमानातून  सात लोकं प्रवास करत असल्याची माहिती मिळते आहे. त्यातील 5 लोकांचा जागीच मृत्यू झाला आहे. एयर फोर्सचं एम आय 17 व्ही 15 हे विमान आज मेन्टेनन्स मिशनवर होतं. तवांग भाग हा खडतर पर्वतरांगाचा आणि बर्फवृष्टीचा प्रदेश आहे. यामुळे कधी कधी अंदाज येत नाही. त्यामुळे हे विमानं कोसळलं असल्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. या घटनेची माहिती एएनआयने ट्विट करून दिली आहे.

एम आय 17 व्ही 15 हे विमान मिल्ट्री ट्रान्स्पोर्टसाठी एक सर्वोत्तम विमान ओळखलं जातं.या प्रकारची एकूण तीन विमान भारताला रशियाने दिली होती. यातील उरलेली दोन चांगलं काम करत आहेत.

First Published: Oct 6, 2017 11:41 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading