बांग्लादेशमध्ये विमान अपहरणाचा प्रयत्न, गोळीबारात एक जण जखमी

बांग्लादेशमध्ये विमान अपहरणाचा प्रयत्न, गोळीबारात एक जण जखमी

बांगलादेशमध्ये विमान अपहरणाचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामध्ये एक क्रु मेंबर देखील जखमी झाला आहे.

  • Share this:

ढाका, 24 फेब्रुवारी : बांग्लादेशमध्ये विमान अपहरणाचा प्रयत्न करण्यात आला आहे. AFP न्यूज एजन्सीनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. बांग्लादेश एअर लाईन्सचं विमान ढाकावरून दुबईला जात होतंं. त्यावेळी विमान अपहरणाचा प्रयत्न करण्यात आला आहे. यानंतर विमानचं इमर्जन्सी लँडिंग देखील करण्यात आलं आहे. दरम्यान, विमानामध्ये झालेल्या गोळीबारामध्ये क्रु मेंबर जखमी झाल्याची देखील माहिती समोर आली आहे.

यावेळी विमानामध्ये 142 प्रवाशी होते. विमानामध्ये गोळीबार करत अपहरणकर्त्यानं बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्याशी बोलणी करून द्या अशी मागणी केली.

भारतात विमान अपहरणाची धमकी

शनिवारी मुंबई विमानतळावर एअर इंडियाच्या ट्राफिक कंट्रोल रूमला एअर इंडियाचं विमान अपहरण करण्याची फोनवरून धमकी देण्यात आली होती. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. या फोन कॉलनंतर विमानतळांवरील सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली होती. शिवाय, देशातील सर्व विमानतळांवर हाय अलर्ट देखील जारी करण्यात आला होता.

गुप्तचर यंत्रणांचा इशारा

पुलवामा दहशतवादी हल्लानंतर दहशतवादी मोठा हल्ला घडवून आणू शकतात असा इशारा यापूर्वी गुप्तचर यंत्रणांनी दिला होता. त्यानंतर देशातील प्रमुख शहरांमध्ये आणि ठिकाणांच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यानंतर आता विमान अपहरणाचा देखील फोन आल्यानं सुरक्षा यंत्रणांना अधिक सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विमान कंपन्यांना देखील खबरदारीने राहण्याची सूचना करण्यात आली आहे.

धमकीच्या कॉलनंतर मुंबई विमानतळ परिसरामध्ये कडेकोट बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 24, 2019 07:38 PM IST

ताज्या बातम्या