रवी सपाटे, प्रतिनिधी
गोंदिया, 18 मार्च : गोंदियातील बिरसी विमानतळावरून उड्डाण केलेल्या प्रशिक्षण विमानाला जवळच्या मध्य प्रदेशाच्या बालाघाट जिल्ह्यात अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात पायलट आणि एक प्रशिक्षणार्थी वैमानिकांचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशच्या बालाघाटमधील किरणापूर भागातील भुक्कूटोला इथं ही अपघाताची घटना घडली आहे. या दुर्घटनेत पायलट आणि एक प्रशिक्षणार्थी वैमानिकांचा मृत्यू झाला आहे. मृतकाचे नाव पायलट मोहित तर महिला प्रशिक्षणार्थी वैमानिकाचे नाव वरसुका असं आहे. घटना आज दुपारची असल्याचे सांगण्यात येत आहे.
(मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर लोखंडी डिव्हायडर कारच्या थेट आरपार; काळजाचा थरकाप उडवणारे फोटो)
बालाघाट जिल्ह्यातील किरणापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भुक्कुटोला येथील घनदाट जंगलात तो अपघात घडला आहे. जवळ जवळ 100 फूट खोल दरीत विमानाचा मलबा सापडला आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच बालाघाट पोलीस घटनास्थळी रवाना झाले आहेत.
(बापरे तब्बल 14 लेन! हा देशात सर्वात रुंद एक्सप्रेसवे, सायकल ते सिग्नल पाहा काय खास)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे एक चार्टर शिकाऊ विमान होतं. विमानामध्ये काही तरी तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे हे विमान घनदाट जंगलात कोसळलं. घटनास्थळी पोहोचल्यावर विमान जळून खाक झाले होते. त्या ठिकाणी एका पायलटचा जळालेला मृतदेह आढळून आला आहे. या अपघातग्रस्त विमानात एक महिला पायलट सुद्धा होती. अपघातग्रस्त विमान हे महाराष्ट्रातील गोंदिया येथील बिरसी विमानतळावरून प्रशिक्षणार्थी विमान होतं. याा विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये मध्यप्रदेशामधील बालाघाट जिल्ह्यात कोसळलं. हा अपघात नेमका कसा घडलाा याची माहिती अद्याप समोर येऊ शकली नाही. या प्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: गोंदिया