नवी दिल्ली, 21 जुलै : केंद्र सरकार 151 रेल्वेंचं खासगीकरण (151 Train Privatization) करणार असल्याचं वृत्त यापूर्वीच समोर आलं आहे. आता यानंतर सरकार रेल्वे स्टेशनचे आधुनिकीकरण करीत त्यांना खासगी क्षेत्रात सोपविण्याची योजना तयार करीत आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी सांगितले की –हे काम लिलावाच्या माध्यमातून केलं जाईल. रेल्वे गाड्याच्या खासगीकरणासाठी लिलाव करण्यात येईल आणि यासाठी चांगला प्रतिसाद मिळत आहे. ते पुढे असंही म्हणाले की – सरकार भारतीय रेल्वेंचे स्टेशन आधुनिक बनविण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यानंतर लिलावाच्या माध्यमातून खासगी क्षेत्राला सोपविण्यात येईल.
हे वाचा-ठाकरे सरकारला पाडण्याचा दिवस ठरला, भाजपने आखला मोठा प्लॅन?
केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी सांगितले की – गुड्स कॉरिडोर प्रकल्पावर कामाची गती वाढविण्याची गरज आहे. कोविड 19 मुळे या कामाला उशीर झालेला आहे. ते म्हणाले – गुड्स कॉरिडोरसाठी पश्चिम बंगालमध्ये जितक्या जमिनीची आवश्यकता आहे, राज्य सरकारने अद्याप या प्रकल्पासाठी स्थापन केलेली विशेष संस्था हस्तांतरित केलेली नाही.
हे वाचा-चांगल्या भवितव्याबाबत पंतप्रधान मोदी साधणार संवाद; जगभरातील नागरिकांचं लक्ष
कलकत्त्यात होऊ शकते मेट्रो सेवा सुरू
रेल्वे मंत्र्यांनी सांगितले की जर राज्य सरकारने याला मंजुरी दिली तर कलकत्तामध्ये मेट्रो सेवा सुरू करण्यात येईल. ते म्हणाले की मुख्यमंत्री ममता बॅनर्जी राज्यात विमान सेवा आणि उपनगरीय रेल्वे सेवा आता सुरू करण्याविरोधात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Indian railway