Special effectsवापरुन पियुष गोयल यांनी पळवली हाय-स्पीड रेल्वे

Special effectsवापरुन पियुष गोयल यांनी पळवली हाय-स्पीड रेल्वे

गोयल यांनी स्वत:च्या कामाचे कौतुक व्हावे यासाठी एक व्हिडिओ शेअर केला खरा पण सोशल मीडियावर त्याची पोलखोल झाली.

  • Share this:

नवी दिल्ली, 10 फेब्रुवारी: प्रत्येक राजकीय नेता त्याने केलेल्या विकास कामाची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. यासाठी सध्या सोशल मीडियाची देखील मदत घेतली जाते. पण अनेक वेळा उत्साहाच्या 'भरात करायला गेलो एक आणि झालं भलतंच' असा अनुभव येतो. केंद्रीय रेल्वे मंत्री आणि हंगामी अर्थमंत्री पियुष गोयल यांच्या बाबत अशीच घटना घडली आहे. गोयल यांनी स्वत:च्या कामाचे कौतुक व्हावे यासाठी एक व्हिडिओ शेअर केला खरा पण सोशल मीडियावर त्याची पोलखोल झाली.

रेल्वेमंत्री गोयल यांनी twitterवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. मेक इन इंडियातून तयार करण्यात आलेली भारतातील पहिली सेमी हाय स्पीड रेल्वे गाडीचा व्हिडिओ असल्याचे सांगत त्यांनी एक पोस्ट शेअर केली. पण या पोस्टमुळे आता ते ट्रोल होत आहेत. गोयल यांनी जो व्हिडोओ शेअर केला आहे तो खरा व्हिडिओ नसून youtubeवर डिसेंबर 2018मध्ये अपलोड करण्यात आलेल्या व्हिडिओला अधिक वेगाने दाखवल्याचा दावा एका युझरने केला आहे.

गोयल यांनी 9 फेब्रुवारी रोजी twitterवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्याखाली Abhishek Jaiswal या युझरने हा व्हिडिओ हा माझा असून तो तुम्ही स्पेशल ईफेट्स देऊन अपलोड केला आहे, असे सांगत मुळ व्हिडिओची youtube लिंक दिली आहे. रेल्वेमंत्र्याच्या या व्हिडिओवर आता चर्चा सुरु झाली आहे. गोयल यांना अनेकांनी ट्रोल करण्यास सुरु केली आहे. गोयल यांनी केलेल्या या twitterवर टीका करण्याची संधी काँग्रेसने देखील सोडली नाही. काँग्रसने मिस्टर गोटाळा असा उल्लेक करत रेल्वेमंत्र्यावर हल्लाचढवला आहे.

First published: February 11, 2019, 10:29 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading