आता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना!

आता एकाच दिवसात मिळेल इन्कम टॅक्स रिटर्न्स, ही आहे योजना!

ऑनलाइन पद्धतीमुळेच 23 कोटी इन्कम टॅक्स रिटर्न्स फाइल झाले आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली 16 जानेवारी : दरवर्षी इन्कम टॅक्स रिटर्न्स भरणं म्हणजे लोकांना कट कट वाटतं. आता ही सगळी प्रोसेस आणखी सोपी करण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. त्यासाठी इ फायलिंग पोर्टल आणि सेंट्रलाइज प्रोसेसिंग सेंटर एकत्र करून एकच इंटिग्रेटेड प्रोसेसिंग सेंटर तयार करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांनी दिलीय. त्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे इन्कम टक्स रिटर्न्स ची प्रोसेस 63 दिवसांवरून एक दिवसावर येणारआहे.

केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाची माहिती पीयुष गोयल यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. यात सगळ्यात महत्त्वाचा निर्णय हा इन्कम टॅक्स रिटर्न्स च्या संदर्भातला होता. या योजनेवर सरकार 4 हजार कोटींचा खर्च करणार आहे. ही योजना पूर्ण व्हायला 18 महिने लागतील अशी माहितीही गोयल यांनी दिली.

गोयल म्हणाले, "डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी आणखी सवलती देण्यात येणार आहेत. इन्कम टॅक्स भरण्याची प्रोसेस आणखी सोपी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे आणि ही पद्धत सोपीही झाली आहे." सरकारच्या उपाययोजनांमुळेच सध्याही पहिल्यापेक्षा इन्कम टॅक्स भरण्याची ऑनलाईन पद्धत खूपच सोपी झाल्याची माहितीही त्यांनी दिली.

महत्त्वाचे मुद्दे

ऑनलाइन पद्धतीमुळेच 23 कोटी इन्कम टॅक्स रिटर्न्स फाइल झाले आहेत.

2 लाख 61 हजार 808 कोटी रुपये रिफंड देण्यात आलेत.

पहिल्या सहा महिन्यात 1 कोटी 83 लाख रिफंड देण्यात आलेत.

नवा प्रकल्प पूर्ण होण्यास 18 महिने लागतील.

जास्तित जास्त लोकांनी स्वत:च ऑनलाइन पद्धतीने रिटर्न्स भरावे हाच सरकारचा उद्देश

VIDEO : आदित्य ठाकरेंची पाठ वळत नाही तोच ग्रामस्थांनी लुटलं पशुखाद्य

First published: January 16, 2019, 5:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading