नवी दिल्ली, 03 नोव्हेंबर: देशातील बेरोजगारी आणि आर्थिक मंदीवरून सत्ताधारी भाजप आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. अशातच काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी RCEP आणि FTA वरुन सरकावर केलेल्या टीकेवर केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी पलटवार केला आहे. काही दिवसांपूर्वी सोनिया गांधी यांनी रिजनल कंप्रेहेन्सिव्ह इकॉनमी पार्टरशीप (RCEP)आणि फ्री ट्रेड अॅग्रीमेंट्स (FTA)वरून सरकारवर हल्ला चढवला होता. RCEP करार देशातील शेतकरी, दुकानदार आणि छोटो व्यापारी यांच्या विरोधी आहे आणि मोदी सरकारच्या आर्थिक धोरणामुळे मंदी आल्याची टीका त्यांनी केली होती.
सोनिया गांधींच्या या आरोपाला गोयल यांनी उत्तर दिले. RCEP देशांसोबतचा व्यापार 7 बिलियनवरून वाढून तो 2014मध्ये 78 बिलियन डॉलरपर्यंत वाढला होता तेव्हा सोनिया गांधी कुठे होत्या. RCEP आणि FTA या दोन्ही करारावरून सोनिया गांधींना आताच कशी काय जाग आली. केंद्रात जेव्हा काँग्रेस नेतृत्वाखालील सरकार होते तेव्हा 2011-12 मध्ये RCEP करारासाठी कोणी पुढाकार घेतला होता? 2010मध्ये आसियान देशासोबत झालेला तेव्हा तुम्ही कोठे होता? 2010मध्ये दक्षिण कोरिया आणि 2011मध्ये मलेशिया आणि जापानसोबत FTA सोबत करार झाले तेव्हा सोनिया गांधी कुठे होत्या असा पलटवार गोयल यांनी केला.
Smt. Sonia Gandhi ji has suddenly woken up to RCEP and FTAs. So where was she
— Piyush Goyal (@PiyushGoyal) November 2, 2019
- When FTA with ASEAN was signed in 2010?
- When FTA with South Korea was signed in 2010?
- When FTA with Malaysia was signed in 2011?
- When FTA with Japan was signed in 2011?
2/5
केंद्रात जेव्हा काँग्रेसचे सरकार होते तेव्हा त्यांच्या सरकारने आसियान देशांसाठी 74 टक्के बाजारपेठ खुली केली होती. पण इंडोनेशिया सारख्या श्रीमंत देशांसाठी फक्त 50 टक्के बाजारपेठ खुली केली होती. आता सरकारवर टीका करणाऱ्या सोनिया गांधी यांनी तेव्हा का आवाज उठवला नाही, असे गोयल म्हणाले. सोनिया गांधी यांनी केलेल्या टीकेवर उत्तर देताना गोयल यांनी माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांचा देखील उल्लेख केला. सोनिया गांधी यांची RCEP आणि FTA वर टीका म्हणजे मनमोहन सिंग यांचा अपमानच आहे.
RCEP संदर्भात मोदींनी याआधीच स्पष्ट केले आहे की हा करार भारतासाठी फायद्याचा होईल. व्यापारातील तोटा कमी करणे ही आमची सर्वात मोठी चिंता असल्याचे गोयल म्हणाले.
काय आहे RCEP आणि FTA
RCEP आणि FTA हे दोन्ही एक मुक्य व्यापार करार आहेत. या मेगा मुक्त व्यापार करारासंदर्भात आसियान देशातील सदस्यांपैकी ब्रुनेई, दारुस्सलाम, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओस, मलेशिया, म्यानमार, फिलिपिन्स, सिंगापूर, थायलंड आणि व्हिएतनामसह ऑस्ट्रेलिया, चीन, भारत, जपान, दक्षिण कोरिया आणि न्यूझीलंड यांच्याशी चर्चा सुरु आहे. हा सर्व देशांमध्ये हा करार व्हावा यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
VIDEO : संजय राऊत यांच्या वक्तव्यावर गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया