मराठी बातम्या /बातम्या /देश /

ही वेळ राजकारण करण्याची नाही, आम्ही सरकारसोबत उभे आहोत : राहुल गांधी

ही वेळ राजकारण करण्याची नाही, आम्ही सरकारसोबत उभे आहोत : राहुल गांधी

'ही राजकीय आरोप-प्रत्यारोपाची वेळ नाही,' असं राहुल गांधी म्हणाले.

'ही राजकीय आरोप-प्रत्यारोपाची वेळ नाही,' असं राहुल गांधी म्हणाले.

'ही राजकीय आरोप-प्रत्यारोपाची वेळ नाही,' असं राहुल गांधी म्हणाले.

नवी दिल्ली, 15 फेब्रुवारी : 'सर्व विरोधी पक्ष सुरक्षा यंत्रणा आणि सरकारसोबत उभे आहेत,' असं म्हणत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुलवामा इथल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. 'ही राजकीय आरोप-प्रत्यारोपाची वेळ नाही,' असंही राहुल गांधी म्हणाले.

काय म्हणाले राहुल गांधी?

-आम्ही शहिदांच्या कुटुंबासोबत

-या घटनेनं प्रत्येक भारतीयाच्या मनाला वेदना झाल्या

-आम्ही सरकारला या प्रसंगी पाठिंबा देऊ

-हा हल्ला देशाच्या आत्म्यावर आहे. आमच्या सैनिकांवर हा हल्ला आहे.

पुलगामात दहशतवाद्यांचा भ्याड हल्ला :

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा इथं सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात सीआरपीएफचे 37 जवान शहीद झाले आहेत. सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी IED द्वारे आत्मघातकी हल्ला केला. हल्लाजैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

'तुम्ही खूप मोठी चूक केली आहे,' असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादी संघटनांना इशारा दिला आहे. जम्मू-काश्मीरमधील पुलवामा इथं सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात सीआरपीएफचे 37 जवान शहीद झाले आहेत. त्यानंतर आता पंतप्रधान मोदींनी प्रतिक्रिया दिली आहे.

-पंतप्रधान मोदींकडून शहिदांना श्रद्धांजली

-दहशतवादी हल्ल्यानंतर प्रत्येक भारतीयाचं रक्त उसळत आहे, याची मला जाणीव

-मला आपल्या सैनिकांच्या शौऱ्यावर पूर्ण विश्वास

VIDEO : ‘बाबा येतो मी…’ शहीद पनमाजचं बाबांसाठी शेवटचं वाक्य

First published:

Tags: Pulwama, Rahul gandhi, Terror attack