Home /News /national /

VIDEO शेअर करून JNU हल्ल्याची 'या' संघटनेनं घेतली जबाबदारी

VIDEO शेअर करून JNU हल्ल्याची 'या' संघटनेनं घेतली जबाबदारी

जेएनयू हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेल्या पिंकी चौधरीने म्हटलं आहे की, जे कोणी लोक देशविरोधी कारवाया करतील त्यांची अवस्था जेएनयूच्या विद्यार्थ्यांसारखी होईल.

    नवी दिल्ली, 07 जानेवारी : जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) झालेल्या हल्ल्याची जबाबदारी हिंदू रक्षा दल या संघटनेनं स्वीकारली आहे. या संघटनेचा नेता भुपेंद्रकुमार तोमर उर्फ पिंकी चौधरीने एका व्हिडिओच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. हिंदू रक्षा दलाचा अध्यक्ष असून हा हल्ला आपणच केल्याचा दावा त्याने केला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत चौधरीने म्हटलं आहे की, जे कोणी लोक देशविरोधी कारवाया करतील त्यांची अवस्था जेएनयूच्या विद्यार्थ्यांसारखी होईल. जेएनयूमध्ये रविवारी झालेल्या हल्ल्याची जबाबदारी आम्ही घेतो. आमच्या धर्माविरुद्ध एवढं चुकीचं बोलणं योग्य नाही. गेल्या अनेक वर्षांपासून जेएनयु हा ड्याव्यांचा अड्डा झाला असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. जेएनयूमध्ये रविवारी जो हल्ला करण्यात आला त्यामध्ये हिंदू रक्षा दलाचे कार्यकर्ते होते असा दावा चौधरीने केला आहे. पिंकी चौधरीच्या विरोधात याआधीही काही गुन्हे दाखल आहेत. त्याला आमद आदमी पार्टीच्या कार्यालयावर हल्ला केल्या प्रकरणी जेलमध्येही जावं लागलं होतं. काय झालं होतं जेएनयू विद्यापीठात? JNU विद्यापीठाच्या परिसरात असलेल्या साबरमती वसतिगृहाच्या टी पॉइंटवर छात्रसंघाकडून सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेला मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते. य़ाच वेळी 40 ते 50 तरुण रुमालाने चेहरा लपवलेले गुंड विद्यापीठाच्या परिसरात घुसले आणि त्यांनी विद्यार्थ्यांना मारहाण सुरू केली. हाताला मिळणारं सामान उचलून त्यांनी तोडफोड केली. समानाचं नुकसान केलं. लोखंडी रॉडने विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केली आणि तरुण पसार झाले. दरम्यान या घटनेनंतर अभविप आणि डाव्या संघटनांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले होते. JNU हल्ला निषेध : मुंबईत विशाल भारद्वाजने सादर केली कविता, VIDEO VIRAL FREE KASHMIR म्हणजे काय? फलक धरलेल्या मुलीनेच केला खुलासा  
    Published by:Suraj Yadav
    First published:

    पुढील बातम्या