पिंपरी-चिंचवड, 08 ऑक्टोबर : पिंपरी-चिंचवड इथे बेकायदेशीर रित्या विक्रीसाठी आणलेले MD ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. पोलिसांना अवैध ड्रग्सचा साठा जप्त करण्यात मोठं यश आलं आहे. जवळपास 20 कोटी रुपयांचा साठा जप्त केला असून या प्रकरणी 5 जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अमली पदार्थ विरोधी पथकाची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे. शेल पिंपळगाव इथे ही कारवाई करण्यात आली आहे.
चेतन फक्कड दंडवते, आनंदगीर मधुगिर गोसावी, अक्षय शिवाजी काळे, संजिवकुमार बन्सी राऊत, तौसिफ हसन मोहम्मद तस्लीम अशी अटक केलेल्या 5 आरोपींची नावं आहेत. चेतन, आनंदगीर, अक्षय हे तिघे महाराष्ट्रातील रहिवासी तर संजिवकुमार झाडखंड आणि तौसिफ हसन उत्तर प्रदेशातील असल्याची माहिती मिळाली आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शाकीर जिनेडी यांनी बुधवारी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात माहिती दिली.
हे वाचा- कोरोनाचा कोरोनाशी लढा; गंभीर विषाणूला रोखतोय Common cold corona
पिंपरी- चिंचवड इथे विक्रीसाठी आणलेले 20 कोटी रुपयांचा मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ पोलिसांनी जप्त केला. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने शेल पिंपळगावमध्ये बुधवारी दुपारी ही कारवाई केली. या प्रकरणी पाच जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही जण अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी सेल पिंपळगाव येथे येणार असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार बुधवारी दुपारी सापळा लावून 5 जणांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडून हे ड्रग्स जप्त केले.