मराठी बातम्या /बातम्या /देश /'...मोदींना पुन्हा भेटायचे आहे', 27 वर्षांपूर्वी पंतप्रधानांना ही मदत करणाऱ्या पायलटने व्यक्त केली इच्छा

'...मोदींना पुन्हा भेटायचे आहे', 27 वर्षांपूर्वी पंतप्रधानांना ही मदत करणाऱ्या पायलटने व्यक्त केली इच्छा

23 वर्षांपूर्वी पंतप्रधान मोदींना पॅराग्लायडिंगमध्ये मदत करणाऱ्या एका पायलटला मोदींना पुन्हा भेटायचे आहे. 23 वर्षांपूर्वी 1997 मध्ये मोदी हिमाचल प्रदेशमध्ये आले असता त्यांनी पॅराग्लायडिंग केलं होतं.

23 वर्षांपूर्वी पंतप्रधान मोदींना पॅराग्लायडिंगमध्ये मदत करणाऱ्या एका पायलटला मोदींना पुन्हा भेटायचे आहे. 23 वर्षांपूर्वी 1997 मध्ये मोदी हिमाचल प्रदेशमध्ये आले असता त्यांनी पॅराग्लायडिंग केलं होतं.

23 वर्षांपूर्वी पंतप्रधान मोदींना पॅराग्लायडिंगमध्ये मदत करणाऱ्या एका पायलटला मोदींना पुन्हा भेटायचे आहे. 23 वर्षांपूर्वी 1997 मध्ये मोदी हिमाचल प्रदेशमध्ये आले असता त्यांनी पॅराग्लायडिंग केलं होतं.

नवी दिल्ली, 30 सप्टेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) 3 ऑक्टोबरला हिमाचल प्रदेशच्या दौऱ्यावर जाणार आहेत.  रोहतांग येथील सर्वात लांब बोगद्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. ते यावेळी नागरिकांना संबोधित देखील करणार आहेत. दरम्यान 23 वर्षांपूर्वी पंतप्रधान मोदींना पॅराग्लायडिंगमध्ये मदत करणाऱ्या एका पायलटला मोदींना पुन्हा भेटायचे आहे. 23 वर्षांपूर्वी 1997 मध्ये मोदी हिमाचल प्रदेशमध्ये आले असता त्यांनी पॅराग्लायडिंग केलं होतं. त्यामुळे आपल्याला पुन्हा एकदा मोदींना भेटण्याची संधी मिळावी, अशी अपेक्षा या पायलटने व्यक्त केली आहे. बुधी प्रकाश असे या 45 वर्षांच्या पायलटचं नाव आहे.

पंतप्रधान मोदी यांचं व्यस्त वेळापत्रक आणि कडक सुरक्षा व्यवस्था यामुळे हे शक्य होणे कमीच आहे. पण तरीदेखील त्याने आपली आशा व्यक्त केली आहे. नरेंद्र मोदी यांच्या त्या दौऱ्याबद्दल त्याने सांगितलं की, '1997 मध्ये हिमाचल प्रदेशचे प्रभारी असताना ते राज्यात आले होते. त्यावेळी त्यांनी सोलन व्हॅलीमध्ये पॅराग्लायडिंग केलं होतं. यामध्ये मी पायलट होतो. सुरुवातीला कोणताही व्यक्ती घाबरतो. मात्र पंतप्रधान मोदी अजिबात घाबरले नव्हते.'

(हे वाचा-Taarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह)

प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यानंतर मोदी कधीही याठिकाणी आले नाहीत. त्यानंतर मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाले आणि पुन्हा या ठिकाणी यायचं त्यांचं स्वप्न राहून गेलं. त्यावेळी त्यांनी कमी वेळ पॅराग्लायडिंग केलं होतं. काही दिवसांनी पुन्हा येऊन आपण जास्त वेळ पॅराग्लायडिंग करणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलं होतं. मात्र त्यांना याठिकाणी येता आलं नाही.

(हे वाचा-मुंबई पोलिसांचे अनुराग कश्यपला समन, #metoo प्रकरणात उद्या होणार चौकशी)

2017 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीतदेखील मोदींनी या घटनेचा उल्लेख केला होता. त्यामुळे आता 3 ऑक्टोबरला ते याच ठिकाणी पुन्हा येणार आहेत. प्रामुख्याने हिमाचल प्रदेशची अर्थव्यवस्था पर्यटनावर आधारित आहे. त्यामुळे कुलू आणि मनाली या दोन ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देत असतात. ज्यावेळी ते या ठिकाणी पॅराग्लायडिंग करायला आले असता मोठ्या पदावर नव्हते, आता ते देशाच्या उच्चपदावर आहेत. त्यामुळे त्यांची भेट घेणं अभिमानाचा क्षण असल्याचं देखील प्रकाश यांनी IANS  शी बोलताना सांगितले.

First published:
top videos

    Tags: PM Naredra Modi