...आणि रस्त्यात टोपी घालून पार्टी करताना दिसलं कबुतर, VIDEO VIRAL

...आणि रस्त्यात टोपी घालून पार्टी करताना दिसलं कबुतर, VIDEO VIRAL

हा VIDEO एकदा बघाच तुम्हीही पडाल या कबुतराच्या प्रेमात.

  • Share this:

लास व्हेगस, 12 डिसेंबर : प्राण्यांचे व्हिडीओ नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. या व्हिडिओंमध्ये प्राणी बर्‍याचदा मजेदार गोष्टी करताना दिसतात. पण तुम्ही कधी एखाद्या कबुतराला पार्टी करताना पाहिलं आहे. बऱ्याच लोकांना कबुतर हा पक्षी विशेष आवडत नाही, तो त्यांच्य आवाजामुळे. मात्र सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ पाहिलात तर तुम्ही सुध्द या कबुतराच्या प्रेमात पडाल.

लास व्हेगलमध्ये एक कबुतर अत्यंत गोंडस आणि मजेदार काउबॉय टोपी घालताना दिसले. हा व्हिडीओ ट्विटरवर ट्रेंड होत आहे. यावर एका ट्विटर युजरने कबुतरानं गमतीशीर काउबॉय टोपी घातल्याचा फोटो वाढला. त्यानंतर हे चित्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यापूर्वीही टोपी असलेले बरेच पक्षी इतके प्रसिद्ध होते की त्यांना सेलिब्रेटी म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

वाचा-‘पंत-एक घोटाळा’, नेटकऱ्यांनी ऋषभवर आजीवन बंदी घालण्याची केली मागणी

एका युझरनं हे चित्र शेअर केल्यानंतर इंटरनेटवर क्षणार्धात हा फोटो व्हायरल झाला. दुसर्‍या व्हिडिओमध्ये कबुतराला लाल टोपी घालून फिरताना पाहिले जाऊ शकते. जवळून जाणा बर्‍याच लोकांनी या कबुतराला टोपी बसवताना पाहिले आणि डोके टेकल्यानंतरही टोपी कबूतरांच्या डोक्यावरुन खाली पडत नसल्याचे आढळले. अशा परिस्थितीत कबुतराच्या डोक्यावर टोपी गोंद लावून चिकटल्या आहेत काय, हा प्रश्न त्याच्या मनात निर्माण झाला.

वाचा-रॅम्पवॉक करताना घसरला साराचा पाय, कार्तिकनं असं सावरलं; पाहा VIDEO

वाचा-कॅप्टन कोहलीच्या फिटनेसमागे आहे ‘दीपिका’! वाचा काय आहे प्रकरण

लोकांनी या चित्र आणि व्हिडिओबद्दल प्रश्न विचारला की, असे कोणी केले आहे? लास वेगास पोलिसांनी न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्ताचा हवाला देत या संदर्भात सांगितले की सध्या कोणत्याही पोलिस प्रकरणाची चौकशी केली जात नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 12, 2019 10:51 AM IST

ताज्या बातम्या