मराठी बातम्या /बातम्या /देश /

खरंच की काय! ऑनलाईन अभ्यासासाठी सरकार सर्व विद्यार्थ्यांना देत आहे दररोज 10 GB डेटा फ्री?

खरंच की काय! ऑनलाईन अभ्यासासाठी सरकार सर्व विद्यार्थ्यांना देत आहे दररोज 10 GB डेटा फ्री?

विज्ञान, गणित आणि इंग्रजी हे विषय शिकवले जाणार. इतर विषयांसाठी ऑनलाईन क्लास असतील.

विज्ञान, गणित आणि इंग्रजी हे विषय शिकवले जाणार. इतर विषयांसाठी ऑनलाईन क्लास असतील.

सोशल मीडियावर सध्या एक मेसेज व्हायरल होत आहे, यामध्ये केंद्र सरकार ऑनलाईन अभ्यासासाठी देशभरातील विद्यार्थ्यांना 10 जीबी इंटरनेट डेटा मोफत देणार असल्याचे सांगण्यात आले होते.

  • Published by:  Priyanka Gawde

नवी दिल्ली, 07 ऑक्टोबर : संपूर्ण देश सध्या कोरोनाव्हायरस (Coronavirus Pandemic) या साथीच्या रोगाशी दोनहात करत आहेत. दरम्यान मार्चपासून कोरोनामुळे शाळा-महाविद्यालय बंद होती, लवकरच त्यांना परवानगी दिली जाणार आहे. मार्चपासून ऑनलाईन वर्ग घेतले जात आहे. यातच सोशल मीडियावर सध्या एक मेसेज व्हायरल होत आहे, यामध्ये केंद्र सरकार ऑनलाईन अभ्यासासाठी देशभरातील विद्यार्थ्यांना 10 जीबी इंटरनेट डेटा मोफत देणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र हा मेसेज फेक असल्याचे समोर आले आहे.

या व्हायरल मेसेजमध्ये असे लिहिले आहे की, कोरोनामुळे शाळा आणि महाविद्यालये बंद झाली आहेत आणि यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम झाला आहे, म्हणून सरकार सर्व विद्यार्थ्यांना विनामूल्य इंटरनेट (दररोज 10 GB ) देत आहे. विद्यार्थ्यांनी आपले शिक्षण पूर्ण करावे आणि इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन परीक्षा घेता यावी यासाठी हे सरकार करत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. या मेसेजमध्ये एक लिंक देखील देण्यात आली आहे आणि असे म्हटले आहे की या लिंकवरून तुम्ही विनामूल्य इंटरनेट पॅक (दररोज 10 जीबी) मिळविण्यासाठी फॉर्म भरू शकता.

वाचा-20 वर्षं पूर्ण झाल्यानिमित्त BSNL ग्राहकांना देणार गिफ्ट

वाचा-आयातीवर बंदी आणल्यानंतर आता Samsung भारतातच सुरू करणार टीव्हीचं उत्पादन

या व्हायरल मेसेजमध्ये असेही लिहिले आहे की लोकांच्या सोयीसाठी हा मेसेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. मात्र पीआयबीच्या फॅक्ट चेकमध्ये हा मेसेज फेक असल्याचे समोर आले आहे. असा कोणताही निर्णय सरकारने घेतलेला नाही आहे.

वाचा-66 दिवस चालते 'या' स्वस्त 4 कॅमेरावाल्या स्मार्टफोनची बॅटरी, कंपनीचा दावा

यापूर्वीही सोशल मीडियावर एक बातमी व्हायरल होत होती, ज्यामध्ये असा दावा केला जात होता की सरकार ऑनलाईन अभ्यासासाठी देशभरातील विद्यार्थ्यांना मोफत स्मार्टफोन वाटप करीत आहे.

First published: