मराठी बातम्या /बातम्या /देश /'स्पेशल सेशन नव्हे फोटोसेशन सुरू'; यूपीतील महिला अत्याचारावरुन प्रियांका गांधींनी योगींना फटकारले

'स्पेशल सेशन नव्हे फोटोसेशन सुरू'; यूपीतील महिला अत्याचारावरुन प्रियांका गांधींनी योगींना फटकारले

काही दिवसांपूर्वी योगी आदित्यनाथ यांच्या फोटोसेशनचे काही फोटो व्हायरल झाले होते

काही दिवसांपूर्वी योगी आदित्यनाथ यांच्या फोटोसेशनचे काही फोटो व्हायरल झाले होते

काही दिवसांपूर्वी योगी आदित्यनाथ यांच्या फोटोसेशनचे काही फोटो व्हायरल झाले होते

लखनऊ, 16 ऑक्टोबर : उत्तर प्रदेशातील महिलांविरोधात वाढणाऱ्या गुन्ह्यांच्या घटना आणि कायदा सुव्यवस्थेबाबत योगी सरकारवर सातत्याने विरोधी पक्षनेते निशाणा साधत आहे. यादरम्यान सोशल मीडियावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या फोटोशूटचे फोटो व्हायरल झाले आहेत. आता यावर काँग्रेस महासचिव प्रियांका गांधींनी गेल्या आठवड्यात उत्तर प्रदेशातील घटनांच्या पार्श्वभूमीवर निशाणा साधला आहे.

प्रियांका गांधींनी ट्विट केलं आहे की, उत्तर प्रदेशात गेल्या आठवड्यात महिलेविरोधात अपराधाच्या 13 घटना समोर आल्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार 4 घटनांमध्ये पीडितेची हत्या करण्यात आली होती तर अनेक ठिकाणी महिलांनी आत्महत्या केली होती. महिला सुरक्षेची ही परिस्थिती चिंता वाढवणारी आहे. मुख्यमंत्र्यांकडे यावर स्पेशल सेशन करण्याचा वेळ नाही, मात्र फोटोसेशन सुरू आहे.

प्रियांकांनी सांगितले गेल्या आठवड्यातील घटना

प्रियांका गांधींनी ट्विटसह एक ग्राफिक्स शेअर केला आहे. ज्यामध्ये उत्तर प्रदेशात गेल्या एक आठवड्यात महिलांविरोधात झालेल्या गुन्ह्यांची आकडेवारी समोर ठेवली आहे. यामध्ये झांसी सामूहिक बलात्कार, गोंडा अॅसिड हल्ला, चित्रकूटमध्ये बलात्कार पीडितेची आत्महत्या सारख्या अनेक घटनांचा समावेश आहे.

बलात्काराच्या घटनांवरुन योगी सरकार बॅकफूटवर

गेल्या काही दिवसात हाथरस-बलरामपूर गोंडा, झांशी आणि चित्रकूटमध्ये महिला आणि मुलींविरोधात झालेल्या गुन्ह्यांबाबत योगी सरकार बॅकफूटवर आहे. हाथरस्या घटनेमुळे योगी सरकार आणि युपी पोलिसांची प्रतीमा खराब झाली आहे. याबाबत अलाहाबाद उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. यावेळी कोर्टाने सरकारवर फटकारले.

First published:

Tags: Priyanka gandhi, Yogi Aadityanath