एका बाजूला 93 वर्षांची आजेसासू आणि दुसरीकडे सासू; इंदौरच्या अकोलेकरांच्या सुनेचं या फोटोमुळे होतंय कौतुक

एका बाजूला 93 वर्षांची आजेसासू आणि दुसरीकडे सासू; इंदौरच्या अकोलेकरांच्या सुनेचं या फोटोमुळे होतंय कौतुक

Mother in Law and Daughter In Law Photo दोन सिनियर सिटिझन महिला कोरोनोच्या काळात आपल्या सुनेसह घराबाहेर पडल्या. असं काय घडलं नेमकं?

  • Share this:

इंदौर, 3 मार्च : देशात कोरोना ओसरतो आहे असं चित्र समोर येत असतानाच अचानक देशात कोरोनाच्या केसेस (Coronavirus Vaccination) वाढायला सुरू झाल्या आहेत. मात्र कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण अभियानही देशात वेगानं सुरू आहे.

कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर्सना लस दिली गेली. आता दुसऱ्या टप्प्यात सामान्य नागरिकांमधील 60 वर्ष वयाच्या व्यक्ती आणि 45 वर्षांहून मोठ्या असलेल्या गंभीर रोगांनी पिडीत असलेल्या व्यक्तींचं लसीकरण अभियान 1 मार्चपासून सुरू झालं. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi takes first jab of COVAXIN ) यांनी स्वतः लस टोचून घेत या मोहिमेचा शुभारंभ केला. (Corona vaccination in India)

याबाबतचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. इंदोरच्या प्रफुल्ल चौरसिया उर्फ आशू पटेल यांनी काढलेला हा फोटो आहे. आशू पटेल हे मुक्त छायाचित्रपत्रकार (Freelance Photojournalist) आहेत. (photojournalist Ashu Patel clicks vaccination event)

त्यांनी काढलेल्या या फोटोला त्यांनी कॅप्शन दिली आहे, 'जिंदगी का डोस'. हा फोटो आशू यांनी इंदोरच्या खंडवा रोड इथं काढला आहे. या फोटोमध्ये एक तरुणी आपल्या दोन्ही हातांना धरून दोन वृद्ध महिलांना रस्त्यावरून नेत असल्याचं दिसतं आहे. या तरुणीचं नाव मानसी असून ती खंडवा रोड इथल्या एका कॉलनीमध्ये राहते. (Corona vaccine for senior citizens)

हेही वाचा कोरोना लस हवी आहे, पण कुठे मिळेल? घरबसल्या शोधा जवळील लसीकरण केंद्र

सोमवारी 1 मार्चला सामान्य नागरिकांमधील 60 वर्ष वयाच्या व्यक्ती आणि 45 वर्षांहून मोठ्या असलेल्या गंभीर रोगांनी पिडीत असलेल्या व्यक्तींचं लसीकरण अभियान सुरू झालं. (corona vaccination)

मानसी आपल्या 68 वर्षीय सासूबाई वसंती अकोलेकर आणि 93 वर्षीय आजेसासू विमल अकोलेकर यांना लस टोचून घेण्यासाठी लसीकरण केंद्रात घेऊन आल्या होत्या. त्यावेळी आशू पटेल यांनी हा फोटो टिपला आहे. (corona vaccination in India news)

हेही वाचा मोदींव्यतिरिक्त अमेरिका, इस्राईलसह कोणत्या देशांच्या नेत्यांनी घेतलीये लस?

लस घेतल्यानंतर काही एडव्हर्स इफेक्ट्स जाणवण्याची शक्यता असते. यात लस दिलेल्या ठिकाणी दुखणं, सूज, हलका ताप, अंगदुखी, घाबरायला होणं, एलर्जी, अंगावर पुरळ अशा तक्रारी जाणवू शकतात. काही तक्रारी मात्र गंभीरही असू शकतात. अशावेळी व्यक्तीला, विशेषत: सिनियर सिटिझन्सना लस घेतेवेळी एखाद्या सुदृढ व्यक्तीची सोबत गरजेची असते.

Published by: News18 Desk
First published: March 3, 2021, 7:22 PM IST

ताज्या बातम्या