Home /News /national /

Pfizer Vaccine : फक्त श्रीमंत देशांनाच ही कोरोनाची लस मिळणार का?

Pfizer Vaccine : फक्त श्रीमंत देशांनाच ही कोरोनाची लस मिळणार का?

    नवी दिल्ली, 13 नोव्हेंबर: कोरोना व्हायरसविरूद्धची लस 90 टक्के प्रभावी ठरल्याचा दावा करणारी फायझर कंपनी. (Pfizer Inc.) आणि बायोएनटेक एसई (BioNTech SE) जेव्हा आपली कोव्हिड-19 वरची लस पूर्णपणे तयार करेल, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील काम शांघाय फोसुन फार्मास्युटिकल ग्रुप कंपनीला (Shanghai Fosun Pharmaceutical Group Company) पार पाडायचं आहे. ही कंपनी चीनमधील डीप फ्रीझ एअरपोर्ट वेअर हाऊस, रेफ्रिजरेटेड गाड्या आणि लसीकरण केंद्रांद्वारे एका क्लिष्ट आणि महागड्या प्रणालीच्या माध्यमातून या लसीचं वितरण करणार आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार लसीकरण केंद्रांवर पोहोचल्यानंतर हे शॉट्स -70 डिग्री सेल्सिअस तापमानात ठेवावे लागतील आणि जर ते खराब झाले नाहीत तर ते 5 दिवसांत लोकांना द्यावे लागतील. मग वेअर हाऊस फ्रीजरमधून लोकांना लस देण्याची ही कठोर प्रक्रिया पुन्हा एक महिन्यानंतर करावी लागेल. हा रोडमॅप ग्रेटर चायनासाठी लायसन्सधारक कंपनीने तयार केला आहे. फायझरने प्रायोगिक तत्त्वावर तयार केलेल्या लसीच्या वितरणासाठी केवढी आव्हानात्मक लॉजिस्टिकची तयारी करावी लागणार आहे याची झलक यातून मिळते. ही लस तिसऱ्या टप्प्यात खूप प्रभावी ठरली आहे. महामारी सुरू झाल्यानंतर सुमारे एक वर्षानंतर त्यावर उपाय शोधून ती संपवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आतापर्यंत आरएनए तंत्रज्ञानावर आधारित एकही लस तयार करण्यात आलेली नाही. याद्वारे मानवी शरीरात प्रोटीन तयार होतात जे नंतर संरक्षणात्मक अँटिबॉडी विकसित करतात. हे वाचा-ऑक्सफोर्डच्या कोरोना लशीचा भारतात महत्त्वाचा टप्पा पार; लवकरच GOOD NEWS मिळणार फक्त समृद्ध देशांपर्यंतनाच मिळेल ही लस? याचा अर्थ असा आहे की लसी टिकण्यासाठी देशांनी डीप-फ्रीझ उत्पादन, साठवण आणि वाहतुकीचे नेटवर्क तयार केले पाहिजे. यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणि समन्वयाची आवश्यकता आहे, परंतु यातून हे देखील कळते की फक्त श्रीमंत देशांमध्येच ही लस वितरित करता येईल आणि तेदेखील केवळ त्यांच्या शहरी लोकसंख्येपर्यंतच. मेलिंडा गेट्स फाऊंडेशनकडून आर्थिक मदत मिळवणाऱ्या बीजिंगमधील ग्लोबल हेल्थ ड्रग डिस्कव्हरी इन्स्टिट्यूटचे संचालक डिंग शेंग म्हणाले, "या लसीचं उत्पादन महागडं आहे, यातील घटक अस्थिर असल्यामुळे कोल्ड-चेन ट्रान्सपोर्ट आवश्यक आहे आणि याची शेल्फ लाइफ देखील खूप कमी आहे." फायझर शॉट लावण्याच्या खर्चामुळे श्रीमंत देशांना आधीच सर्वोत्तम लस मिळेल अशी भीती सर्वांना वाटते आहे. जागतिक आरोग्य संघटनेने पाठिंबा दिलेल्या कोवॅक्ससोबतच त्यांनी गरीब देशांसाठी लस खरेदी करण्यासाठी 18 अब्ज डॉलर्स गोळा करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Coronavirus, Coronavirus symptoms

    पुढील बातम्या