CAA विरोधी निदर्शनांवर EDचा खळबळजनक खुलासा, कपिल सिब्बलांसह अनेकांना दिले 134 कोटी

CAA विरोधी निदर्शनांवर EDचा खळबळजनक खुलासा, कपिल सिब्बलांसह अनेकांना दिले 134 कोटी

PFI ही एक कट्टर संघटना समजली जाते. या संघटनेच्या केरळ मॉड्युलचा ISISशी संबंध असल्याचा दावाही पोलिसांनी केला होता.

  • Share this:

नवी दिल्ली 27 जानेवारी : केंद्र सरकारने केलेल्या CAA कायद्याविरोधात देशभर निदर्शने सुरु आहेत. या विरोधी निदर्शनांवर EDने खळबळजनक खुलासा केलाय. या खुलाश्यामुळे या विरोधी आंदोलनावर शंका निर्माण झाली आहे. पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) आणि रिहॅब इंडिया फाउंडेशन या संस्थांनी देशभर CAA विरोधात आंदोलनांना पाठिंबा दिल्याचं बोललं जातंय. या दोन संस्थांशी संबंधीत असलेल्या विविध 73 बँक खात्यांची माहिती EDला मिळाली असू त्यात तब्बल 134 कोटी रुपये जमा झाल्याचा दावा केला जातोय. काही ज्येष्ठ वकिलांनाही हे पैसे देण्यात आल्याचा दावा केला जातोय.

PFI च्या बँक अकाऊंट्समधून देशातल्या काही दिग्गज वकिलांना पैसे देण्यात आले आहेत. यात कपिल सिब्बल आणि इंदिरा जयसिंह यांचा समावेश आहे. 2 ते 3 दिवसांमध्ये PFI च्या बँक अकाउंट्समध्ये 120 कोटी आले होते. त्यानंतर काही लगेच ते पैसे काढण्यात आले.

शाहीन बाग आणि इतर ठिकाणी जे आंदोलन सुरू आहे त्यामागे याच संघटनांचा पैसा असून विदेशातूनही त्याला फंडिंग झालं असाही आरोप होतोय. CAAविरोधात उत्तर प्रदेशात काही आठवड्यांपूर्वी जो हिंसाचार झाला होता त्यात PFIचा हात असल्याचा आरोप उत्तर प्रदेशच्या पोलीस महासंचालकांनी केला होता.

PFI ही एक कट्टर संघटना समजली जाते. या संघटनेच्या केरळ मॉड्युलचा ISISशी संबंध असल्याचा दावाही पोलिसांनी केला होता.

First published: January 27, 2020, 2:26 PM IST

ताज्या बातम्या