आता महाराष्ट्रासह देशातील 8 राज्यातील पेट्रोलपंप रविवारी बंद राहणार!

आता महाराष्ट्रासह देशातील 8 राज्यातील पेट्रोलपंप रविवारी बंद राहणार!

फक्त रुग्णवाहिका आणि आपातकालीन सेवेच्या वाहनांनाच रविवारी पेट्रोल भरून दिले जाईल.

  • Share this:

19 एप्रिल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमातून केलेल्या इंधन वाचवा या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी पेट्रोलियम वितरकांच्या संघटनेने एका निर्णयाची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे येत्या 14 मे पासून देशातील आठ राज्यांतील पेट्रोलपंप दर रविवारी बंद राहणार आहेत. तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, हरयाणा या राज्यांमध्ये या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.

देशातील पेट्रोलियम वितरकांच्या संघटनेने घेतलेल्या निर्णयानुसार देशातील आठ राज्यांतील पेट्रोलपंप दर रविवारी बंद राहणार आहेत. फक्त रुग्णवाहिका आणि आपातकालीन सेवेच्या वाहनांनाच रविवारी पेट्रोल भरून दिले जाईल. त्यासाठी रविवारी पेट्रोल पंपावर एक कर्मचारी उपलब्ध असणार आहे.

यापूर्वीही पेट्रोल पंप रविवारी बंद ठेवण्याचा प्रस्ताव मांडला होता. मात्र, त्यावेळी तेल उत्पादक कंपन्यांच्या आग्रहाखातर आम्ही या निर्णयाचा फेरविचार करत होतो. पण आता पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा निर्णय पक्का झाल्याचं पेट्रोलियम वितरक संघटनेच्या कार्यकारिणीचे सदस्य सुरेश कुमार यांनी म्हटलं आहे.

पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा हा निर्णय पंतप्रधान मोदींच्या ‘मन कि बात’मधील तेल बचतीच्या आहवानाच्या पार्श्वभूमीवर घेतला आहे. तसेच, या निर्णयामुळे पेट्रोल पंप चालकांना 150 कोटींचा फटकाही बसू शकतो, असा अंदाजही कुमार यांनी व्यक्त केला आहे.

First published: April 19, 2017, 9:29 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading