तुमच्याकडे पेट्रोल पंपच नाही? घाबरू नका या ठिकाणी मिळणार पेट्रोल – डिझेल

आता सुपरमार्केटमध्ये पेट्रोल- डिझेल उपलब्ध करून देण्याबाबत सरकार गांभीर्यानं विचार करत आहेत.

News18 Lokmat | Updated On: Jun 18, 2019 01:57 PM IST

तुमच्याकडे पेट्रोल पंपच नाही? घाबरू नका या ठिकाणी मिळणार पेट्रोल – डिझेल

नवी दिल्ली, 18 जून : पेट्रोल – डिझेल हवं असेल तर आपल्याला पेट्रोल पंप गाठावं लागतं. अनेकवेळा रस्त्यामध्येच पेट्रोल संपल्यानंतर खूप धावपळ होते. पेट्रोल पंपापर्यंत जाताना ही बाईक, कार नको अशीच काहीशी भावना होते. पण, आता तुम्हाला पेट्रोल किंवा डिझेल भरण्यासाठी पंपावर जाण्याची गरज नाही. अगदी तुमच्या घराच्या बाजुला सुपरमार्केटमध्ये तुम्हाला पेट्रोल – डिझेल सहज उपलब्ध होणार आहे. आता तुम्हाला ते कसं शक्य आहे? हा प्रश्न नक्की पडला असेल नाही का? तर, आता सुपरमार्केट, रिटेल स्टोअर्समध्ये देखील तुम्हाला पेट्रोल – डिझेल उपलब्ध होणार आहे. या नव्या योजनेवर सरकार गांभीर्यानं विचार करत आहे. त्याबाबतचा प्रस्ताव देखील तयार करण्यात आला आहे. पेट्रोलियम मंत्रालयानं आणि कॅबिनेट याबाबत प्रस्ताव तयार करणार असल्याची माहिती बिझनेस स्टॅडर्डनं दिली आहे. सध्या पेट्रोल – डिझेलबाबत अनेक कठोर नियम आहेत. शिवाय, पेट्रोल पंपावरच पेट्रोल – डिझेलची विक्री केली जाते. पण, पुढील काही दिवसांमध्ये मात्र यामध्ये बदल झाल्याचं दिसू शकतं.


बापरे ! सॅनिटरी पॅडमधून 3 कोटींच्या ड्रग्सची तस्करी; महिला गजाआड

काय आहे प्लॅन

- नियमांमध्ये बदल केल्यास साऊदी आरामको सारख्या मोठ्या कंपनीला भारतातील रिटेल व्यवसायामध्ये उतरण्याची संधी मिळेल.

Loading...

इंग्लंडमध्ये ही योजना यापूर्वीच यशस्वीरित्या राबवली जात आहे.

- इंग्लंडमध्ये योजनेचं यश पाहिल्यानंतर भारतात योजनेबद्दल गांभीर्यानं विचार सुरू झाला.

- इंग्लंडमध्ये सुपरमार्केटच्या द्वारे होणाऱ्या पेट्रोलचा वाटा हा 49 टक्के आहे. तर, डिझेलचा वाटा हा 43 टक्के आहे. तर, टेस्को, सेंसबरी सारखी कंपनी इंधन विक्रीच्या व्यापारामध्ये आहे.

या सर्व गोष्टींचा विचार करता आता भारत सरकार देखील त्यावर गांभीर्यानं विचार करत आहे.


'ही काय पद्धत झाली का?' अजित पवारांचा संताप, मुख्यमंत्र्यांचंही जोरदार उत्तर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 18, 2019 01:11 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...