दिवाळीपर्यंत पेट्रोल डिझेलचे भाव कमी होण्याचे संकेत-पेट्रोलियम मंत्री

दिवाळीपर्यंत पेट्रोल डिझेलचे भाव कमी होण्याचे संकेत-पेट्रोलियम मंत्री

अमेरिकेत पूर आल्यामुळे तेलाचे उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे रिफायनरी तेलाचे भाव वाढले होते. येत्या काळातही हे चित्र बदलण्याची चिन्हं असल्याचं प्रधान यांनी सांगितलं

  • Share this:

19 ऑगस्ट: गेल्या काही महिन्यात पेट्रोल डिझेलचे भाव वधारले होते. त्यामुळे सामान्यांच्या मनात बराच रोष निर्माण झाला आहे. पण येत्या दिवाळीपर्यंत पेट्रोल डिझेलचे भाव घसरण्याची शक्यता असल्याची माहिती पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधाना यांनी दिली आहे.

अमेरिकेत पूर आल्यामुळे तेलाचे उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे रिफायनरी तेलाचे भाव वाढले होते. येत्या काळातही हे चित्र बदलण्याची चिन्हं असल्याचं प्रधान यांनी सांगितलं. तसंच पेट्रोल आणि डिझेलवर सुद्धा जीएसटी कर लागू होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे ग्राहकामना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळेल

आता पेट्रोलचे भाव कमी होतात का याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 19, 2017 10:11 AM IST

ताज्या बातम्या