Elec-widget

पेट्रोल-डिझेल 2 रुपयांनी महागण्याची शक्यता

पेट्रोल-डिझेल 2 रुपयांनी महागण्याची शक्यता

पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये केंद्र सरकार अबकारी कर वाढवण्याची घोषणा करू शकतं.

  • Share this:

(असीम मनचंदा,असोसिएट एडिटर, CNBC आवाज)

नवी दिल्ली, 08 डिसेंबर : पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता आहे. सीएनबीसी आवाजला मिळालेल्या एक्सक्लुझिव्ह माहितीनुसार, पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये केंद्र सरकार अबकारी कर वाढवण्याची घोषणा करू शकतं. सरकारने 2 रुपये प्रतिलिटर पर्यंत अबकारी कर वाढवू शकतो. आॅक्टोबर महिन्यात सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अबकारी कर 1 रुपयांने कमी करण्याची घोषणा केली होती.

सध्या पेट्रोलवर अबकारी कर हा 18.48 रुपये प्रतिलिटर आहे आणि डिझेलवर 14.33 रुपये प्रतिलिटर वसूल केला जातो. त्यानंतर व्हॅट लावला जातो. त्यामुळे वेगवेगळ्या राज्यात इंधनाचे दर वेगवेगळे आहे. कच्या तेलाचे भाव घसरले आणि रुपयाचा भाव वधरल्यामुळे या आठवड्याच्या सुरुवातीला पेट्रोलचे दर 80 रुपयांहुन खाली आले आहे.

आॅक्टोबरमध्ये कच्चा तेलाचे दर हे 86.74 डॉलर प्रति बॅरल इतके होते. जेव्हा इंधनाच्या दरात भरमसाठ वाढ झाली होती. तेव्हा सर्वसामान्यांना दिलासा देत पेट्रोलियम कंपन्यांकडून 1 रुपया तर केंद्र सरकारने दीड रुपयांची कपात केली होती. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अडीच रुपयांची कपात झाली अशी घोषणा जेटली यांनी केली होती. राज्य सरकारला याबद्दल तशी सुचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतर भाजपशासित राज्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले होते. पण, आता पुन्हा एकदा इंधनाच्या दरात भडका उडण्याची शक्यता आहे.


Loading...

=================


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 8, 2018 05:31 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...