मराठी बातम्या /बातम्या /देश /Petrol-Diesel Price : पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, जाणून घ्या तुमच्या शहरांतील दर काय?

Petrol-Diesel Price : पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, जाणून घ्या तुमच्या शहरांतील दर काय?

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC), हिंदुस्थान पेट्रोलियम (HPCL) आणि भारत पेट्रोलियम (BPCL) या तेल कंपन्यांनी सोमवारी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC), हिंदुस्थान पेट्रोलियम (HPCL) आणि भारत पेट्रोलियम (BPCL) या तेल कंपन्यांनी सोमवारी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC), हिंदुस्थान पेट्रोलियम (HPCL) आणि भारत पेट्रोलियम (BPCL) या तेल कंपन्यांनी सोमवारी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत.

नवी दिल्ली, 27 डिसेंबर: गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय बाजारात वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. गेल्या ट्रेडिंग सत्रात, जागतिक मानक मानल्या जाणार्‍या ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल 1.01 टक्क्यांनी वाढून $76.07 वर पोहोचली आहे. त्याच वेळी, जागतिक स्तरावर, न्यूयॉर्कमध्ये वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट कच्च्या तेलाच्या किमती 1.42 टक्क्यांनी वाढून डॉलर 73.79 प्रति बॅरलवर पोहोचल्या.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC), हिंदुस्थान पेट्रोलियम (HPCL) आणि भारत पेट्रोलियम (BPCL) या तेल कंपन्यांनी सोमवारी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत. तेल कंपन्यांनी आज इंधनाच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. राजधानी दिल्लीत आज पेट्रोलचा दर 95.41 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 86.67 रुपये प्रति लिटर आहे.

राजधानी दिल्लीत आज पेट्रोलचा दर 95.41 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 86.67 रुपये प्रति लिटर आहे. मुंबईत आज पेट्रोलचा दर 109.98 रुपये प्रतिलिटर आहे, तर एक लिटर डिझेलचा दर 94.14 रुपये आहे.

तामिळनाडूची राजधानी चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 101.40 रुपये आणि एक लिटर डिझेलची किंमत 91.43 रुपये आहे. त्याच वेळी, कोलकातामध्ये आज पेट्रोलचा दर प्रति लिटर 104.67 रुपये आणि डिझेलचा दर 89.79 रुपये प्रति लिटर आहे.

पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).

2022 मध्ये क्रूड डॉलर 90 च्या वर जाऊ शकते

मॉर्गन स्टॅनलीने कच्च्या तेलात आणखी वाढ अपेक्षित असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे आणि 2022 मध्ये ब्रेंट क्रूड प्रति बॅरल  डॉलर 90 ची पातळी ओलांडेल, मॉर्गन स्टॅनलीच्या मते, कच्च्या तेलाच्या मागणीत सातत्याने वाढ होत आहे. मात्र मागणीनुसार उत्पादन वाढेल, असे कोणतेही संकेत नसल्याने कच्च्या तेलात वाढ कायम राहण्याची शक्यता आहे. गोल्डमनच्या मते, 2022 मध्ये कच्च्या तेलाची मागणी नवीन विक्रमी पातळीवर पोहोचू शकते.. त्यामुळे ब्रेंटच्या किमती प्रति बॅरल डॉलर 100 च्या पुढे जातील.

First published:

Tags: Petrol and diesel, Petrol and diesel price, Petrol Diesel hike