S M L

देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा भडका कायम!

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इंधनाची दरवाढ झाल्याने देशातील पेट्रोल, डिझेलचे दरही भडकले आहेत.

Renuka Dhaybar | Updated On: Apr 26, 2018 07:30 AM IST

देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा भडका कायम!

26 एप्रिल : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इंधनाची दरवाढ झाल्याने देशातील पेट्रोल, डिझेलचे दरही भडकले आहेत. मुंबईत पेट्रोलने लिटरमागे ८२ रुपये ५२ पैसे तर डिझलने लिटरमागे ७० रुपये २४ पैसे इतके दर गाठले.

दुसरीकडे पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करण्यास केंद्रीय अर्थ खातं तयार नसल्याने सर्वसामान्य नागरिकांना तुर्तास दिलासा मिळण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार इतकं नक्की.

इराण- अमेरिकेमधला अण्वस्त्रावरुन वाढता तणाव, व्हेनेझुएलातील अंतर्गत समस्या आणि मागणीत झालेली वाढ या कारणामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे भाव प्रति बॅरल ८० डॉलरपर्यंत (सुमारे ५ हजार ३१४ रुपये) पोहोचले आहेत.

काही तज्ज्ञांनी तर कच्चा तेलाचे दर १०० डॉलरच्या घरात जाऊ शकेल, अशी भीती व्यक्त केली आहे. बुधवारी कच्चा तेलाच्या दराने नोव्हेंबर २०१४ नंतरचा उच्चांक गाठला आहे. याचे पडसाद भारतात उमटले आहेत. दिल्ली, मुंबईत पेट्रोल आणि डिझेलच्या दराने नवा उच्चांक गाठला.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 26, 2018 07:30 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close