S M L

पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर, 'हे' आहेत आजचे दर

पेट्रोलच्या दरात सोमवारी 21 पैशांनी तर डिझेलमध्ये 8 पैशांची वाढ झाली होती. 17 डिसेंबरनंतर ही पहिलीच इंधन दरवाढ आहे. पण आज इंधन दर कायम असल्याचं पाहायला मिळत आहे.

Updated On: Jan 8, 2019 10:00 AM IST

पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर, 'हे' आहेत आजचे दर

मुंबई, 8 जानेवारी : देशातील प्रमुख चार शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे भाव आज स्थिर असल्याचं पाहायला मिळालं. तब्बल महिन्याभरानंतर काल इंधनाचे दर वाढले होते. पण आज पुन्हा दर स्थिर राहिले आहेत.

पेट्रोलच्या दरात सोमवारी 21 पैशांनी तर डिझेलमध्ये 8 पैशांची वाढ झाली होती. 17 डिसेंबरनंतर ही पहिलीच इंधन दरवाढ आहे. गेल्या काही दिवसांपासून इंधनाचे दर कमी होताना पाहायला मिळत होते. त्यामुळे सर्वसामान्यांनी समाधान व्यक्त केलं होतं. पण आता इंधन दर कायम असल्याचं पाहायला मिळत आहे.

काय आहेत मुंबईतील दर?


पेट्रोल : 74.16

डिझेल : 65.12


Loading...


पेट्रोल-डिझेलचे दर का झाले होते कमी?

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या कमी होणाऱ्या किमती हे पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याचं मुख्य कारण आहे. मागील एका महिन्यात कच्च्या तेलाचे दर 40 टक्क्यांनी दर कमी झाले आहेत. तसंच लिबियाकडून अलिकडच्या काळात कच्च्या तेलाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढलं आहे.

ऑक्टोबरमध्ये कच्च्या तेलाचे दर 84 डॉलर प्रतिबॅरल एवढे होते. आता हेच दर 55 डॉलर प्रतिबॅरल इतके घसरले आहेत.


VIDEO : या 5 खेळाडूंमुळे भारताने ऑस्ट्रेलियात मिळवला ऐतिहासिक विजय




बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 8, 2019 09:58 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close