पेट्रोल, डिझेल पुन्हा महाग होण्याची शक्यता

पेट्रोल, डिझेल पुन्हा महाग होण्याची शक्यता

तेलाचे दर कमी होतानाचं चित्र आता लवकरच बदलू शकतं.

  • Share this:

मुंबई, 13 नोव्हेंबर : इंधन दरवाढीचा फटका सहन करणाऱ्या सर्वसामान्यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता आहे. कारण आता पेट्रोल डिझेची दरवाढ होण्याची शक्यता आहे.

सौदी अरेबियानं आपलं तेल उत्पादन दररोज 5 लाख बॅरेल्सनं कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तेलाचे दर कमी होतानाचं चित्र आता लवकरच बदलू शकतं. भारतही कच्च्या तेलासाठी आखाती देशांवर अवलंबून आहे. त्यामुळे सौदी अरेबियाच्या या निर्णयाचे भारतावरही परिणाम होऊ शकतात.

तेल निर्यातदार देशांची लवकरच बैठक होणार आहे. यामध्ये अन्य देशही उत्पादन कमी करण्याचा निर्णय जाहीर करण्याच्या तयारीत आहे. तेलाचे दर घसरल्यामुळे तेल निर्यातदार देशांचा महसूल कमी झाला आहे, त्यामुळे ते उत्पादन कमी करणार आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी पेट्रोलने नव्वदीकडे वाटचाल केली होती. त्यामुळे इंधन दर आटोक्यात आणण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी इंधनाच्या करामध्ये अडीच रूपयांची कपात करण्याचा निर्णय घेतला होता.

तसंच राज्यांनीही आपल्या करांमध्ये कपात करावी असं आवाहन त्यांनी केलं होतं. त्याल प्रतिसाद देत काही राज्यांनीही केंद्र सरकारप्रमाणेच अडीच रूपयांनी टॅक्स कमी केला होता. त्यामुळं काही राज्यांमध्येही पाच रूपयांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर झाले होते.

महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, छत्तीसगड, झारखंड, त्रिपरा, गुजरात आणि मध्यप्रदेश या राज्यांनी इंधन दरात कपात करण्याचा निर्णय घेतला होता.

सौदी अरेबियासारख्या तेल उत्पादक देशांच्या भूमिकेमुळे आता भारतालाही फटका बसू शकतो. केंद्र सरकार येणाऱ्या काळात हे इंधनदर आटोक्यात ठेवण्यासाठी काय प्रयत्न करणार, हे पाहावं लागेल.

VIDEO : विषारी सापासोबत युवकाची स्टंटबाजी; व्हिडीओ व्हायरल

First published: November 13, 2018, 8:58 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading