S M L

सरकारकडून गुड न्यूज मिळणार? पेट्रोल-डिझेलच्या किंमती पुन्हा कमी होण्याची शक्यता

भडकलेल्या इंधन दरांमुळे सर्वसामान्य हवालदिल झाले होते. याच मुद्द्यावरून काँग्रेसने केंद्र सरकारविरोधात मोठी राळ उठवली होती.

Updated On: Jan 2, 2019 04:13 PM IST

सरकारकडून गुड न्यूज मिळणार? पेट्रोल-डिझेलच्या किंमती पुन्हा कमी होण्याची शक्यता

नवी दिल्ली, 2 जानेवारी : गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी होत आहेत. इंधन दराबाबत केंद्र सरकारकडून सर्वसामान्यांना दिलास मिळण्याची शक्यता आहे. कारण देशातील रिफायनरींची क्षमता वाढत असल्याने स्थानिक बाजारात पेट्रोल-डिझेल कमी किंमतीत मिळेल, असं म्हणत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दरकपातीचे संकेत दिले आहेत.

दरम्यान, 1 जानेवारीला मुंबईत पेट्रोल 17 तर डिझेल 20 पैशांनी स्वस्त झालं. त्यामुळे वाहनचालकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. काही महिन्यांपूर्वी भडकलेल्या इंधन दरांमुळे सर्वसामान्य हवालदिल झाले होते. याच मुद्द्यावरून काँग्रेसने केंद्र सरकारविरोधात मोठी राळ उठवली होती.

इंधन दराचा भडका झाल्याने मोदी सरकारवर चहुबाजूने टीका झाली. हा रोष कमी करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने इंधनावरील करामध्ये कपात करण्याचाही निर्णय घेतला होता.


1 जानेवारीचे मुंबईतील इंधनाचे दर

पेट्रोल: 74.30 रुपये प्रतिलीटर

डिझेल: 65.56 रुपये प्रतिलीटर

Loading...

पेट्रोल-डिझेलचे दर का झाले कमी?

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या कमी होणाऱ्या किमती हे पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याचं मुख्य कारण आहे. मागील एका महिन्यात कच्च्या तेलाचे दर 40 टक्क्यांनी दर कमी झाले आहेत. तसंच लिबियाकडून अलिकडच्या काळात कच्च्या तेलाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढलं आहे.

ऑक्टोबरमध्ये कच्च्या तेलाचे दर 84 डॉलर प्रतिबॅरल एवढे होते. आता हेच दर 55 डॉलर प्रतिबॅरल इतके घसरले आहेत.


VIDEO: अवघ्या 2 तासांत बदललं चित्र, राफेल ऑडिओ क्लिपवरून लोकसभेत काँग्रेस बॅकफूटवर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 2, 2019 04:13 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close